आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य 

 गुरुवार, १९ मार्च २०२६.




 फाल्गुन अमावस्या / चैत्र शुक्ल प्रतिपदा. वसंत ऋतू. शके १९४८, संवत २०८२. पराभवनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


आज शुभ दिवस आहे. आज *गुढी पाडवा* (सकाळी ६.५४ नंतर गुढी उभारावी). अभ्यंग स्नान करावे, कडुनिंबाचे चूर्ण सेवन करावे.


चंद्रनक्षत्र - उत्तरा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) व्यय स्थानी चंद्र आहे मात्र रवी-चंद्र युतीमुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन कामांची सुरुवात करणे लाभदायक ठरेल. सणाचा आनंद द्विगुणित होईल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आर्थिक लाभाचे योग आहेत. घरात आनंदाचे वातावरण राहील. गुढी पाडव्याच्या निमित्ताने नवीन खरेदी होईल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) चंद्र-शनी युतीमुळे थोडा मानसिक ताण जाणवेल. महत्वाचे निर्णय पुढे ढकला. धार्मिक कार्यात मन लागेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत सण साजरा कराल. आरोग्य उत्तम राहील. घरात शुभकार्याचे संकेत आहेत.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अष्टम स्थानी चंद्र आहे. रवीचा प्रभाव वाढल्याने मान-सन्मान मिळेल. कामात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.


कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) खर्च वाढण्याची शक्यता आहे. तरीही आनंदी वातावरण राहील. प्रवासाचे योग संभवतात.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) चंद्र-नेपच्यून युतीमुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. निर्णय घेताना काळजी घ्या. सर्जनशील कामात यश मिळेल.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अनुकूल ग्रहमान आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. सणामुळे उत्साह वाढेल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरीत व व्यवसायात चांगल्या संधी मिळतील. प्रवासाचे योग आहेत. नवीन योजना आखाल.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. परदेशाशी संबंधित कामे मार्गी लागतील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) द्वितीय चंद्रामुळे थोडी अनुकूलता जाणवेल. मात्र आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढेल.


मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) चंद्र आपल्या राशीत असल्याने मन प्रसन्न राहील. सणाचा आनंद घ्याल. नवीन सुरुवातीसाठी उत्तम दिवस.


-सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments