जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटी, कोल्हापूर येथे १५ मार्च रोजी शपथविधी व पदग्रहण सोहळा

 जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटी, कोल्हापूर येथे १५ मार्च रोजी शपथविधी व पदग्रहण सोहळा



कोल्हापूर १२ सिटी न्यूज नेटवर्क 

 सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जायंट्स वेलफेअर फाउंडेशन २ के अंतर्गत कार्यरत जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटी, कोल्हापूर यांच्या वतीने नवीन कार्यकारिणीचा शपथविधी व पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी सायं. ६.०० वाजता  प्रेविला अपार्टमेंट (जोकी), महादेव मंदिर, कृष्णा मेडिकल समोर, रंकाळा रोड, कोल्हापूर येथे होणार आहे.


या कार्यक्रमात मा. प्रा. तानाजी विष्णू पाटील यांची सन २०२६ साठी अध्यक्ष म्हणून निवड झाली असून त्यांच्यासह संचालक मंडळ व नवीन सदस्यांचा १९ वा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा पार पडणार आहे.


कार्यक्रमासाठी नगरसेवक तथा परिवहन समिती सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच मंगालताई कुलकर्णी, डॉ. राजकुमार पोंळ, श्रीमती अनुला पाटील, सौ. मंदाकिनी सागदे, श्रीमती बबिता जाधव, सुरेशजी खांडकेर, डॉ. शरदचंद्र दिवाण आणि डॉ. सौ. आशा शितोळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.


या कार्यक्रमास मा. श्री. रविंद्र मिस्त्री (फेड. डाय., यु.१) यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच अनेक मान्यवर, पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.


सन २०२६ च्या कार्यकारिणीत प्रा. तानाजी विष्णू पाटील (अध्यक्ष), श्रीमती सुलता प्रकाश मोरे व श्रीमती अनिता अनिल कदम (उपाध्यक्ष), सौ. कमल तानाजी पाटील (कार्यवाह), सौ. आयेशा फिरोज खान (पी.आर.ओ.), सौ. शुभदा मोहन कामत (आय.पी.पी.) तसेच इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.


या कार्यक्रमास नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments