गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘बालक मंदिर क्र. १’ मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया
गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘बालक मंदिर क्र. १’ मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू; मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाया
कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क
दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित ‘बालक मंदिर क्र. १’ येथे गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. १९२१ पासून शैक्षणिक क्षेत्रात भक्कम परंपरा असलेल्या या संस्थेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे.
शिशु गट, छोटा गट आणि मोठा गट या स्तरांमध्ये प्रवेश उपलब्ध असून, पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
या शाळेची वैशिष्ट्ये विशेष आकर्षक आहेत. हवेशीर व प्रशस्त वर्गखोल्या, ई-लर्निंगची सुविधा, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तसेच मुलांसाठी सुसज्ज खेळाची बाग उपलब्ध आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विविध शैक्षणिक अॅक्टिव्हिटीजवर भर दिला जातो.
मराठीसोबतच सुरुवातीपासून इंग्रजी शिक्षणाची सोय असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तसेच हस्ताक्षर, पाठांतर, फॅन्सी ड्रेस, कथाकथन यांसारख्या विविध स्पर्धांचे नियोजन करून विद्यार्थ्यांमधील कौशल्यांना वाव दिला जातो.
इतर शाळांच्या तुलनेत अत्यंत परवडणाऱ्या शुल्कात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे ही या संस्थेची खासियत असून, सर्वसामान्य कुटुंबांसाठी ही उत्तम संधी ठरत आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक पालकांनी मुख्याध्यापिका सौ. वृंदा अभ्यंकर (मो. ९४२०४९२७२५) किंवा श्री. एस. के. तांदळे (मो. ७९७२२४७८३५) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी [www.neskolhapur.com](http://www.neskolhapur.com) या संकेतस्थळाला भेट द्यावी.
👉 आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच योग्य पाऊल उचला!

Comments
Post a Comment