मेन राजाराम हायस्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क
महिला दिन हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून स्त्रीच्या सामर्थ्याचा, त्यागाचा, संघर्षाचा आणि अमर्याद कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा दिवस आहे. आपला स्वाभिमान जपत आई-वडील व गुरूजनांनी दिलेल्या संस्कारांच्या मार्गावर चालत राहावे, असे प्रतिपादन पोस्टमन शितल सोळसे यांनी केले. त्या जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर येथे आयोजित महिला दिन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांनी सांगितले की, स्त्री ही केवळ घराचा आधारस्तंभ नसून तिच्या संयमामुळे आणि सहनशीलतेमुळे संसाराला शांती व समाधान मिळते. तिच्या भक्तीमुळे घर उजळते आणि प्रत्येक अडचणीवर मात करण्याची ताकद निर्माण होते. त्यामुळे स्त्रीचा सन्मान आणि आदर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
यावेळी हिंद कन्या छात्रालय, टाकाळा (कोल्हापूर) येथील अधिक्षक वंदना कांबळे, भवानी मंडप येथे खेळणी विक्री करणाऱ्या पूजा शंभू साह, इन्सपायर अवॉर्ड प्राप्त महेक मुश्तकली देसाई तसेच एक किंवा दोन मुली असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात वंदना कांबळे (अधिक्षक), प्रिया खाडे, दिशा चव्हाण, सृष्टी कंदले आणि प्रणाली तोडकर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका शितल पत्रावळे यांनी केले. अतिथींचे स्वागत व परिचय प्रा. बाबासाहेब माळवे यांनी करून दिला. सूत्रसंचालन सुषमा पाटील यांनी केले तर आभार प्रमिला मळगे यांनी मानले.
या कार्यक्रमाला अयोध्या धुमाळ, दिपा लोहार, एच. जे. पठाण, विद्या कदम, दिपाली पाटील, पुनम माळी, माधवी खाडे, प्रणाली जांभळे, सरोजिनी चव्हाण, संगिता चव्हाण, अनिल लाड, बी. टी. यादव, हर्षवर्धन काटकर, संजय कुंभार, विकास पाटील, राहूल देशमुख, डॉ. संतोष माने, राजू मोरे, प्रफुल्ल कदम, निलेश साळोखे, शुभम गुरव यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment