आजचे राशिभविष्य
शनिवार, २१ मार्च २०२६.
चैत्र शुक्ल तृतीया. वसंत ऋतू. शके १९४८, संवत २०८२. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
"आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे" *गौरी तृतीया*
नक्षत्र: अश्विनी (केतू)
आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष. (एइंद्र योग)
२१ मार्च रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुम्ही अत्यंत महत्वाकांक्षी आहात, मान सन्मान तुम्हाला आवडतात. तुम्ही प्रतिष्ठा जपतात. इतरांच्या भावना तुम्ही सहानुभूतीपूर्वक समजून घेतात. तुम्ही उत्साही आणि कार्यक्षम आहात. तुम्हाला जीवनात यश मिळते आणि प्रगती होत राहते. तुम्ही एक दयाळू आणि प्रेमळ वडील असतात. आयुष्यात उशिराने तुम्हाला कीर्ती प्राप्त होते. स्वतःच्या मानपाना बद्दल तुम्ही जागरूक असतात. धार्मिक पर्यटन, निसर्ग यांची तुम्हाला आवड असते. शास्त्र, कला, साहित्य मनोरंजन यांची तुम्हाला आवड असते. तुम्ही कल्पक आहात.
अहंकार, गर्व, दांभिकपणा आणि हट्टीपणा टाळला पाहिजे. इतरांच्या वरचढ असावे असे तुम्हाला नेहमी वाटते.
व्यवसाय:- न्याय क्षेत्र, राजकारण, सेक्रेटरी, सरंक्षण, प्रवचनकार, सल्लागार, शिक्षक, सराफी व्यवसाय.
शुभ रंग - जांभळा.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)
आज तुमच्याच राशीत चंद्र आहे. बुध आणि मंगळाचा प्रभाव असल्याने उत्साह वाढेल. नवीन कामाची सुरुवात कराल. धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. मात्र संध्याकाळनंतर थोडी चिडचिड होऊ शकते.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)
आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. गुप्त शत्रू सक्रिय राहू शकतात. मात्र गुरूची कृपा असल्याने मोठे नुकसान टळेल. ध्यान-उपासना करा.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा)
आज लाभस्थानातील चंद्रामुळे आर्थिक लाभ होतील. मित्रांकडून मदत मिळेल. नवीन संपर्क उपयोगी पडतील. सामाजिक क्षेत्रात यश मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)
दशम स्थानी चंद्र असल्याने करिअरमध्ये प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. घर आणि काम यामध्ये संतुलन राखा.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे)
भाग्यस्थानातील चंद्र अनुकूल आहे. प्रवासाचे योग येतील. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. गुरूच्या कृपेने अडलेली कामे पूर्ण होतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो)
अष्टम चंद्रामुळे थोडी अस्थिरता जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. अचानक खर्च वाढू शकतो. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
सप्तम स्थानी चंद्र असल्याने संबंध सुधारतील. जोडीदाराची साथ मिळेल. भागीदारीत यश मिळेल. नवीन करार फायदेशीर ठरतील.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)
षष्ठ चंद्रामुळे शत्रूंवर विजय मिळेल. आरोग्यात सुधारणा होईल. कामात स्पर्धा वाढेल पण त्यातून यश मिळेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
पंचम चंद्र अनुकूल आहे. बुद्धिमत्तेचा योग्य वापर कराल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रेमसंबंध मजबूत होतील.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी)
चतुर्थ चंद्रामुळे घरातील वातावरण चांगले राहील. वाहनसुख मिळेल. मात्र मानसिक चंचलता राहू शकते. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा)
तृतीय चंद्रामुळे धाडस वाढेल. लहान प्रवास होऊ शकतो. भावंडांची साथ मिळेल. प्रयत्नांना यश मिळेल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची)
द्वितीय चंद्रामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. बचतीकडे लक्ष द्या.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment