स्वर्गीय विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणादिनी पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणींचे दान
स्वर्गीय विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणादिनी पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणींचे दान
कोल्हापूर दि.०२ सिटी न्यूज नेटवर्क
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे वडील, कोल्हापूर जिल्हा बेकर्स संघटनेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर (वय ८८) यांच्या द्वितीय पुण्यस्मरणदिनानिमित्त सामाजिक उपक्रमातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना च्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणींचे दान करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे दुःखाच्या प्रसंगातही समाजहित जपण्याचा संदेश देण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी स्वर्गीय विनायकराव क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, “क्षीरसागर कुटुंबियांच्या दुःखात शिवसेना परिवार सहभागी आहे. समाजकार्याला अग्रस्थान देण्याची परंपरा जपत त्यांच्या स्मृतींना आदरांजली म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला,” असे सांगितले.
यानंतर १० हजार शेणी महानगरपालिका प्रशासनाकडे औपचारिकरीत्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, परिवहन सदस्य रोहन अतिग्रे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष दीपक चव्हाण, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, रमेश खाडे, उदय भोसले, सुनील जाधव, अरविंद मेढे, माजी नगरसेवक राजू हुंबे, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, प्रभू गायकवाड, अर्जुन आंबी, कपिल नाळे, धनाजी कारंडे, अंकुश निपाणीकर, सुरेश माने, अर्जुन संकपाळ, राजवर्धन अर्जुनिकर, सचिन भोळे, मंदार तपकिरे, सचिन क्षीरसागर, किरण पाटील, सुशील भांदिगरे, धनाजी दळवी आदी पदाधिकारी व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
या समाजोपयोगी उपक्रमातून स्वर्गीय विनायकराव क्षीरसागर यांच्या स्मृतींना अर्थपूर्ण अभिवादन करण्यात आले.

Comments
Post a Comment