आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य 

 शुक्रवार, १३ मार्च २०२६





 * तिथी: फाल्गुन कृष्ण दशमी (आज वृद्धी तिथी आहे)

 * संवत्सर: विश्वावसुनाम संवत्सर (शके १९४७, संवत २०८२)

 * विशेष योग: व्यतिपात योग शांती.

 * चंद्रनक्षत्र: पूर्वाषाढा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु.

 * ग्रहस्थिती: चंद्र लाभ बुध, चंद्र प्रतियुती गुरू.

राशीभविष्य

 मेष : नशिबाची साथ मिळेल. लाभाचे योग आहेत. बुधाच्या शुभयोगामुळे व्यवसायात हुशारीने घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील. 


वृषभ : अष्टम स्थानी चंद्र आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. कामात अडथळे येतील, मात्र संयम राखल्यास संकटातून मार्ग निघेल. 


 मिथुन: जोडीदाराची चांगली साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान वाढेल. व्यवसायात नवीन भागीदारीचे योग येतील. 


कर्क : शत्रूंवर विजय मिळवाल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल, पण कामात समाधान लाभेल. 


 सिंह : संततीकडून सुखद बातम्या मिळतील. बुद्धीचा वापर करून कठीण कामे मार्गी लावाल. कला क्षेत्रातील लोकांना संधी मिळेल. 


 कन्या : घरगुती कामात व्यस्त राहाल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. 


तूळ : भावंडांशी संबंध सुधारतील. पराक्रमात वाढ होईल. छोटे पण फायदेशीर प्रवास घडतील. आत्मविश्वासाने कामे पूर्ण करा. 


वृश्चिक : धनलाभ होण्याचे योग आहेत. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतात. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. 


धनु : तुमची राशी आणि तुमचेच नक्षत्र असल्याने मन प्रसन्न राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. 


मकर : अनावश्यक खर्च टाळा. झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड होऊ शकते. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल. 


कुंभ: उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मित्रांसोबत आनंदात वेळ जाईल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. 


मीन : कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकारण्यास तयार राहा. 


कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments