एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत व्यंकटेश, श्रवण, ओजस, अच्युत संयुक्तपणे आघाडीवर

  एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत व्यंकटेश, श्रवण, ओजस, अच्युत संयुक्तपणे आघाडीवर



कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क 

श्रीमंत नारायणीराजे अखिलेशसिंहराजे घाटगे (कागल ज्युनिअर) यांच्या वाढदिवसानिमित्त अनुज चेस अकॅडमी व उत्कर्ष फ्रेंड्स सर्कल यांच्या वतीने यशवंतराव घाटगे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कागल येथे १७ वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीअखेर चार खेळाडूंनी संयुक्तपणे आघाडी घेतली आहे.
पहिल्या पटावर व्यंकटेश खाडेपाटील (४ गुण) यांनी समर्थ घुले (३ गुण) यांचा पराभव केला.
दुसऱ्या पटावर श्रवण ठोंबरे (४ गुण) यांनी आरुष ठोंबरे (३ गुण) यांच्यावर विजय मिळवला.
तिसऱ्या पटावर ओजस व्हनमाने (४ गुण) यांनी यश हेंडगे (३ गुण) यांना नमवले.
चौथ्या पटावर अच्युत दावणे (४ गुण) यांनी आद्विक विचारे (३ गुण) यांच्यावर मात केली.

या स्पर्धेत ५ मानांकित (फिडे रेटेड) खेळाडूंसह एकूण ६५ खेळाडूंनी सहभाग घेतला असून स्पर्धा चुरशीची होत आहे.

स्पर्धेचे उद्घाटन श्रीमंत अखिलेशसिंहराजे घाटगे यांच्या हस्ते पटावरील पहिली चाल करून करण्यात आले.
यावेळी कागल नगरपरिषदेच्या नगरसेविका सारिका पिष्टे व सुवर्णा पिष्टे, यशवंतराव घाटगे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव कृष्णात पाटील, अनुज चेस अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक बाबुराव पाटील तसेच न्यू उत्कर्ष फ्रेंड्स सर्कलचे राजू कचरे उपस्थित होते.

स्पर्धेच्या पुढील फेऱ्यांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Comments