कुरुंदवाडमध्ये ‘लोकायत चषक’ बुद्धिबळ स्पर्धेचे २२ मार्च रोजी आयोजन
कुरुंदवाड १५ सिटी न्यूज नेटवर्क
जैन सांस्कृतिक भवन, कुरुंदवाड येथे लोकायत संस्थेतर्फे रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी ‘लोकायत चषक’ भव्य खुल्या व वयोगटातील जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुरुंदवाडमध्ये प्रथमच अशा प्रकारची बुद्धिबळ स्पर्धा होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
ही स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने होणार असून ११ वर्षाखालील, १७ वर्षाखालील आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस लीग पद्धतीने एकूण सात फेऱ्यांत सामने खेळवले जाणार आहेत.
प्रत्येक गटासाठी १२ हजार रुपये अशी एकूण ३६ हजार रुपयांची रोख बक्षिसे व चषक ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक गटात २५ अशी एकूण ७५ बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्यास ३ हजार रुपये व चषक, उपविजेत्यास २ हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे.
याशिवाय उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपटू, उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू, उत्कृष्ट शिरोळ तालुका बुद्धिबळपटू तसेच ८, १०, १३ व १५ वर्षांखालील खेळाडूंना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी प्रवेश फी २५० रुपये असून कुरुंदवाडमधील बुद्धिबळपटूंना १५० रुपये प्रवेश फी आहे. सर्व सहभागी खेळाडूंना दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बुद्धिबळपटूंनी शुक्रवार, दि. २० मार्चपर्यंत खालील व्यक्तींशी संपर्क साधून नावनोंदणी करावी :
विनायक बिडकर (९०२१७११११७), स्वाती अंबाडे (७२१८९५५१८९), आरती मोदी (८१४९७४०४०५), रोहित पोळ (९६५७३३३९२६), प्रतीक आलासे (९६०४०४४००७) आणि वृषभ आलासे (८८८८६०४२१५).
ही माहिती लोकायत संस्थेचे रावसाहेब आलासे व चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी पत्रकाद्वारे दिली.

Comments
Post a Comment