KIT कॉलेज प्रकरणावर हिंदू एकता आंदोलन आक्रमक; SP योगेश कुमार यांना निवेदन
कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूरातील KIT College of Engineering Kolhapur येथे एका विभागप्रमुख प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असल्याने कॉलेजमधील इतर विद्यार्थिनींनाही विश्वासात घेण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी Hindu Ekta Andolan तर्फे करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि.१०) दुपारी सुमारे १२.३० वाजता हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष Dipak Sureshrao Desai यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक Yogesh Kumar यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले.
यावेळी बोलताना दीपक देसाई म्हणाले, “या प्रकरणात पीडित मुलींनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही ६ मार्च रोजी स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्हा (FIR) दाखल केला आहे. संबंधित प्राध्यापकाच्या वर्तनामुळे इतर काही विद्यार्थिनीही पीडित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत विद्यार्थिनींची विश्वासपूर्वक चौकशी होणे आवश्यक आहे.”
देसाई यांनी पुढे सांगितले की, कॉलेज प्रशासनाने पीडित विद्यार्थिनीची बाजू समजून घेण्याऐवजी तिलाच पुरावे सादर करण्याची मागणी करत मानसिक त्रास दिल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. तसेच या प्रकरणाचा गैरफायदा घेत काही राजकीय कार्यकर्ते खंडणी गोळा करत असल्याची माहिती मिळत असून, याचीही पोलिसांनी सखोल चौकशी करून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पोलीस अधीक्षकांचे आश्वासन
निवेदन स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक Yogesh Kumar यांनी शिष्टमंडळाच्या भावना जाणून घेतल्या. या प्रकरणात जातीने लक्ष घालून पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण राहावे यासाठी पोलीस प्रशासन तातडीने आवश्यक पावले उचलेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी Hindu Ekta Andolan चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये विलास मोहीते, बाबू साखळकर, प्रतिक डिसले, अॅड. आसावरी कुलकर्णी, ऐश्वर्या मुनिश्वर, अॅड. शुभांगी निंबाळकर, सुधाकर वडगांवकर, आनंदा कवडे, नागेश ऊगार, सुनिक ठाकुर, राहुल गोंदील, अंजली जाधव, अॅड. अनुप कुलकर्णी, राजेंद्र करंबे, शिवाजी चिले, हिंदूराव शेळके, अनिकेत पोवार यांचा समावेश होता.

Comments
Post a Comment