UPSC मध्ये यशस्वी अभिषेक सुरेश मगदूम यांचा शिवशाही प्रतिष्ठानतर्फे सत्कार


UPSC मध्ये यशस्वी अभिषेक सुरेश मगदूम यांचा  शिवशाही प्रतिष्ठानतर्फे सत्कार




कोल्हापूर १८ सिटी न्यूज नेटवर्क 

श्री सिद्ध बटुकेश्वर कॉलनी येथील रहिवासी अभिषेक सुरेश मगदूम यांनी UPSC परीक्षेत तब्बल पाच प्रयत्नांनंतर यश मिळवले आहे. या यशात सर्वप्रथम त्यांचे कुटुंब आणि मार्गदर्शकांची मोलाची भूमिका होती.

अभिषेक म्हणतात, "यशाला कोणताच शॉर्टकट नसतो. सतत प्रयत्न करत राहिले तर यश निश्चित मिळते. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करावे आणि त्यासाठी सातत्याने मेहनत करावी."

अभिषेकच्या यशस्वी प्रवासात त्यांच्या वडिल सुरेश मगदूम  चुलते रमेश मगदूम, सुदेश मगदूम,  चुलतबंधू अक्षय मगदूम, अमोल मगदूम तसेच संपूर्ण मगदूम परिवाराचा  पाठिंबा खूप मोलाचा ठरला. 

यशाचा आनंद साजरा करण्यासाठी शिवशाही प्रतिष्ठान तर्फे अभिषेकचा सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी महेश तुप्पद ,शुभम हिवरे, विशाल घोडके , अनिल कडगावे, चंद्रकांत जगदाळे तसेच श्री बटुकेश्वर कॉलनी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात अभिषेकच्या कुटुंबीयांनी तसेच मार्गदर्शकांनी त्यांचे कौतुक केले आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.

अभिषेकचे हे यश तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे – "जर ठरवलेले ध्येय गाठायचे असेल, तर चिकाटीने प्रयत्न करत राहावे. यश निश्चित मिळते."


Comments