कंपनी सेक्रेटरी : विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल करिअरचा उत्तम पर्याय : सीएस पवन चांडक
कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) च्या कोल्हापूर चॅप्टरने २० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली असून, या चॅप्टरमध्ये सध्या १७४ सदस्य कार्यरत आहेत. कॉर्पोरेट आणि प्रशिक्षणार्थी कंपनी सेक्रेटरी यांचा यात समावेश असून ते विविध नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत.
आयसीएसआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीएस पवन चांडक यांनी कोल्हापूर भेटीदरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत कंपनी सेक्रेटरी (CS) हा पेशा विद्यार्थ्यांसाठी प्राधान्यक्रमाचा कसा बनवता येईल यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, कंपनी सेक्रेटरी हा कंपनीच्या कायदेशीर व प्रशासकीय कामकाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्ये त्यांची भूमिका निर्णायक असते.
विद्यार्थ्यांमध्ये सीएस कोर्सबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, “अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर हा कठीण अभ्यासक्रम पूर्ण करून उच्च पदांवर पोहोचण्याची मोठी संधी या क्षेत्रात आहे.”
सध्या देशात सुमारे १.५ लाख कंपनी सेक्रेटरींची गरज असूनही पुरेशा प्रमाणात व्यावसायिक उपलब्ध नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर आयसीएसआयकडून विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये या कोर्सचा प्रचार-प्रसार केला जात आहे.
खाजगी आणि सरकारी क्षेत्रात कंपनी सेक्रेटरींना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, “कमी खर्चात उच्च पदांवर काम करण्याची संधी या कोर्समुळे मिळते.”
कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये सीएस क्षेत्राचा विस्तार व्हावा यासाठी आयसीएसआय विशेष प्रयत्न करत असून, पश्चिम महाराष्ट्रात या पेशाचा प्रसार वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष सीएस स्वप्नील पाटोळे यांनी सांगितले की, “विद्यार्थी आणि सदस्यांना मार्गदर्शन मिळावे, तसेच सीएस क्षेत्राचा विस्तार व्हावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.”
यावेळी सीएस जयदीप पाटील, सीएस ज्योतिबा गावडे, सीएस सचिन बिडकर, सीएस प्रवीण निंगोरे, अमित कुमार, शाहिद महाबरी आदी उपस्थित होते.
📌 CS कोर्सची माहिती (Career Guide)
सीएस कोर्स तीन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे :
फाउंडेशन – एक्झिक्युटिव्ह – प्रोफेशनलबारावीनंतर कोणत्याही शाखेतील विद्यार्थी हा कोर्स करू शकतो
पदवीधर विद्यार्थ्यांना थेट एक्झिक्युटिव्ह स्तरात प्रवेश
कालावधी : साधारण २.५ ते ३ वर्षे
प्रमुख विषय : कंपनी कायदा, कर कायदे, आर्थिक व व्यावसायिक कायदे
🎯 कंपनी सेक्रेटरीची भूमिका
कंपनीच्या कायदेशीर बाबींचे व्यवस्थापन
टॅक्स फायलिंग व ऑडिट
संचालक मंडळाला मार्गदर्शन
कंपनी कायदेशीर नियमांचे पालन करते याची खात्री

Comments
Post a Comment