‘सामाजिक समता सप्ताह’ निमित्त कोल्हापुरात भव्य रक्तदान शिबिर संपन्न
कोल्हापूर १३ सिटी न्यूज नेटवर्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त कोल्हापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या सामाजिक समता सप्ताहाअंतर्गत १३ एप्रिल रोजी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत हे शिबिर पार पडले.
![]() |
समाज कल्याण विभाग, विचारे माळ, कोल्हापूर येथे आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदानाच्या माध्यमातून समाजातील गरजू रुग्णांना मदत करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
सदर कार्यक्रम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन नाळे कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी समाज कल्याण अधिकारी अक्षय कुरणे, अधीक्षक सचिन पाटील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यसेवेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याची संधी नागरिकांना मिळाली.



Comments
Post a Comment