जोतिबा यात्रेसाठी झंवर उद्योग समूहाची मोफत बस सेवा; पर्यावरणपूरक उपक्रमालाही प्रतिसाद

 जोतिबा यात्रेसाठी झंवर उद्योग समूहाची मोफत बस सेवा; पर्यावरणपूरक उपक्रमालाही प्रतिसाद



कोल्हापूर ०१ सिटी न्यूज नेटवर्क 

 श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेनिमित्त लाखो भाविकांच्या सोयीसाठी झंवर उद्योग समूहातर्फे यंदाही मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. पंचगंगा नदी घाट ते जोतिबा डोंगर असा हा बससेवेचा मार्ग असून, गेली तब्बल १३ वर्षे ही सेवा अविरतपणे सुरू ठेवण्यात आली आहे.



यात्रेदरम्यान मोठ्या संख्येने भाविक पायी चालत डोंगर चढतात. अशा वेळी वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी ही मोफत बस सेवा मोठा आधार ठरत आहे. सुरक्षित, सुलभ आणि विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत झंवर उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.

याचबरोबर, पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी भाविकांना पर्यावरणपूरक पिशव्यांचेही वाटप करण्यात येत आहे. प्लास्टिकचा वापर टाळावा आणि स्वच्छता राखावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून भाविकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

झंवर उद्योग समूह गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेत असून, यात्रेच्या काळात भाविकांच्या सेवेसाठी सातत्याने पुढाकार घेत आहे. या उपक्रमामुळे भाविकांच्या प्रवासाला दिलासा मिळत असून, समाजात सकारात्मक संदेशही पोहोचत आहे.

Comments