आजचे राशिभविष्य
गुरुवार, २ एप्रिल २०२६.
चैत्र पौर्णिमा. वसंत ऋतू. पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"आज उत्तम दिवस आहे"
*हनुमान जन्मोत्सव*. वैशाख स्नान आरंभ.
चंद्र नक्षत्र - हस्त / (संध्याकाळी ५.३९ नंतर) चित्रा
आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या. (ध्रुव योग शांती)
२ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही भावनाशील आहात. मात्र कधी कधी स्पष्टवक्ते होतात. आणि कठोर भूमिका घेतात. इतरांच्या सूचनेप्रमाणे तुम्ही कृती करतात मात्र याचा अर्थ असा नाही की तुमचे स्वतंत्र विचार नाहीयेत. मात्र इतरांच्या विचारांची आणि कर्तृत्वाचे तुम्ही कदर करतात. योग्य काय आणि अयोग्य काय याची तुम्हाला सहज जाण होऊ शकते. तुम्ही एखादे ध्येय मनावर घेतात आणि ते पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाहीत. प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला घाई असते आणि तुमचे विचार कृतीत उतरवण्याचा तुम्ही उतावळेपणा करतात. एखादी तुमची स्वतःची चूक तुमच्या लक्षात आले तरी ते मान्य करणे तुम्हाला जमत नाही. तुमच्यात अहंकार असू शकतो. दुर्बल लोकांना तुम्ही मदत करतात. तुमच्यात नैतिक धैर्य असते. मित्रा बद्दल तुम्हाला प्रेम असते. आणि तुम्ही नेहमी त्याची बाजू घेत असतात. तुम्ही कायदा प्रेमी आहात. दूरच्या प्रवासाचे तुम्हाला आवड असते. इतरांना तुम्ही सहज आकर्षून घेतात. तुमच्या अंगात उत्साहाच्या आणि नवनवीन कल्पना तुम्हाला सुचत असतात. वयाने ज्येष्ठ असलेल्या लोकांकडे तुमचा ओढा असतो. वय वर्ष 30 नंतर तुमचा भाग्योदय होतो. वयाच्या चाळिशीनंतर तुमची आर्थिक स्थिती सुधारते. प्रिय व्यक्तीसाठी तुम्ही अधिक खर्च करतात. आर्थिक परिस्थिती समाधानकारक असते.
व्यवसाय:- लेखन, वक्ता, पुढारी, डॉक्टर, केमिस्ट, लोखंड संबंधित, इंजिनिअर, द्रवपदार्थ संबंधित,
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)
षष्ठ चंद्रामुळे जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. नवीन ओळखी होतील. काही शुभ वार्ता समजतील.
वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)
व्यवसायात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना सावध रहा. संततीची काळजी घ्या.
मिथुन:-(का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)
चतुर्थ चंद्रामुळे बुद्धिमत्तेचा उत्तम उपयोग कराल. अडचणी सहज सुटतील. अधिकार वाढेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)
घरगुती कामात वेळ जाईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. मान-सन्मान मिळेल.
सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)
पराक्रम वाढेल. जुने वाद मिटतील. इतरांना मदत कराल. मन एकाग्र राहील.
कन्या:-(टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)
तुमच्या राशीत चंद्र असल्याने व्यक्तिमत्व खुलून दिसेल. नवीन कल्पनांना वाव मिळेल. गायक आणि कलाकार याना यश मिळेल.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
संमिश्र ग्रहमान आहे. समाजकार्याची संधी मिळेल. बुद्धिमत्तेचा योग्य वापर करा. खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक:-(तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)
चंद्राची अनुकूलता आहे. भरघोस यश मिळेल. मोठे निर्णय विचारपूर्वक घ्या. संयम आवश्यक आहे.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
चंद्र-गुरू योगामुळे लाभ होईल. नवीन संधी मिळतील. भागीदारीत यश मिळेल. वाहन सुख लाभेल.
मकर:-(भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)
कामात सातत्य ठेवावे लागेल. यंत्र हाताळताना काळजी घ्या. एकाग्रता वाढवा.
कुंभ:-(गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)
संमिश्र ग्रहमान आहे. अष्टम्स स्थानी चंद्र आहे. अडचणी दूर होतील. प्रवासाचे योग आहेत. मनातील संभ्रम कमी होईल.
मीन:-(दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)
संयम ठेवावा लागेल. कामात बदल संभवतो. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments
Post a Comment