कोल्हापुरात प्रशासनिक बदलांची मालिका; प्रमुख पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

 कोल्हापुरात प्रशासनिक बदलांची मालिका; प्रमुख पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती



कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क 

 जिल्ह्यातील प्रशासनिक यंत्रणेत मोठे फेरबदल करण्यात आले असून विविध महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विजय राठोड यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या बदलामुळे जिल्हा प्रशासनात नवीन धोरणे आणि कार्यपद्धतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तसेच, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेंद्र बारूड हे नवीन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. शहरातील विकासकामे आणि प्रलंबित प्रकल्पांना गती मिळण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांची सोलापूर जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. जॅस्मिन यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.

या प्रशासनिक बदलांमुळे जिल्ह्यातील विकासकामांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नवीन अधिकारी लवकरच पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात करणार आहेत.

Comments