कागलमध्ये शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात; पार्थ, शिवम आणि ओजस ठरले विजेते

 कागलमध्ये शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात; पार्थ, शिवम आणि ओजस ठरले विजेते



कोल्हापूर (कागल) २१ सिटी न्यूज नेटवर्क 

 डी. आर. माने महाविद्यालय, कागल येथे अनुज चेस ॲकॅडमीच्या वतीने आयोजित शालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धा 9 वर्षांखालील, 13 वर्षांखालील आणि 13 वर्षांवरील (खुला) अशा तीन गटांमध्ये घेण्यात आल्या. प्रत्येक गटात सुमारे 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून स्पर्धा पाच फेऱ्यांमध्ये रंगली.


स्पर्धेचे उद्घाटन प्रवीण सुतार आणि श्रीनय पालनकर यांच्या हस्ते पटावरील चाल करून करण्यात आले.


लहान गट (9 वर्षांखालील):

पार्थ सुतार याने प्रथम क्रमांक पटकावला. श्रीनय पालनकर द्वितीय, कृष्णराज चव्हाण तृतीय, अंशराज चव्हाण चौथा आणि शौर्य कांडेकरी पाचवा क्रमांक मिळवला. उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून कैवल्या चव्हाण हिचा गौरव करण्यात आला.


मध्यम गट (13 वर्षांखालील):

शिवम साबळे प्रथम, वरद चौगुले द्वितीय, शौर्य पाटील तृतीय, शिवराज फडतारे चौथा आणि अंश निंबाळकर पाचवा क्रमांकावर राहिले. उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून शरयू कांडेकरी हिला सन्मानित करण्यात आले.


मोठा गट (13 वर्षांवरील/खुला):

ओजस व्हनमाने याने प्रथम क्रमांक मिळवला, तर सोहम चौगुले द्वितीय ठरला. उत्तेजनार्थ पारितोषिक रणवीर पुनुगडे आणि स्वरा सुतार यांना देण्यात आले.


स्पर्धेसाठी पंच म्हणून अनुज चेस ॲकॅडमीचे प्रशिक्षक आणि जिल्हा चेस असोसिएशनचे खजिनदार बाबूराव पाटील यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण समारंभ कोल्हापूर जिल्हा चेस असोसिएशनचे माजी सचिव कृष्णात पाटील, मोहन कांडेकरी, रणजीत चव्हाण, बाबूराव पाटील आणि प्रवीण सुतार यांच्या हस्ते पार पडला.


स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार कदम, डॉ. श्रीनिवास पाटील आणि प्रा. संग्राम तोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनुराग पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments