पट्टणकोडोलीतील पाच खेळाडूंची जिल्हा क्रिकेट संघात निवड
कोल्हापूर (पट्टणकोडोली), १४ सिटी न्यूज नेटवर्क
पट्टणकोडोली येथील युवा क्रिकेटपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत 2026-27 हंगामासाठी कोल्हापूर जिल्हा अंडर-12 क्रिकेट संघात आपले स्थान पक्के केले आहे. व्यंकटेश जालिंदर जाधव, स्वराज सिद्धू बोरगावे, श्रेयश सागर भोमान, साद राजू मुल्ला आणि चैतन्य संताजी नारू खान या पाच खेळाडूंची जिल्हा संघात निवड झाली आहे.
ही सर्व खेळाडू इचलकरंजी येथील सिद्धिविनायक क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रशिक्षक उत्तम तनंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि प्रशिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाला मिळालेलं हे यश मानलं जात आहे.
याबाबत व्यंकटेश जाधव म्हणाला, “आगामी काळात आणखी मेहनत करून देशासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे.”
या यशाबद्दल पट्टणकोडोली परिसरातून सर्व खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments
Post a Comment