आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य 

 शुक्रवार, ३ एप्रिल २०२६.






 चैत्र कृष्ण प्रतिपदा. वसंत ऋतू. पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


आज उत्तम दिवस आहे.


चंद्र नक्षत्र - चित्रा / (संध्याकाळी ७.२५ नंतर) स्वाती.

आज जन्मलेल्या बाळाची राशी - तुळ. (व्याघात योग शांती)


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

सहकाऱ्यांकडून चांगली बातमी मिळेल. आर्थिक उत्पन्न वाढेल. काव्य आणि शास्त्रात रुची वाढेल.


वृषभ:-(इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल. कुटुंबात आनंद राहील. नातेवाईकांशी संपर्क वाढेल.


मिथुन:-(का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

विद्या आणि ज्ञानप्राप्तीचा दिवस आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. वाहन सुख लाभेल.


सिंह:-(मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

नवीन संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल. कर्जे मंजूर होतील. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल.


कन्या:-(टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

मान-सन्मान मिळेल. दूरच्या ठिकाणांहून संपर्क येईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

चंद्र राशीत असल्याने व्यक्तिमत्व खुलून दिसेल. लोकप्रियता वाढेल. यश आणि सन्मान मिळेल.


वृश्चिक:-(तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

सुरुवातीला अडचणी येतील पण नंतर अनुकूलता वाढेल. संयम ठेवा. संध्याकाळ आनंददायी असेल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

कौटुंबिक आनंद मिळेल. सहजीवनात समाधान राहील. आर्थिक स्थिरता राहील.


मकर:-(भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

अनुकूल दिवस आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल. सर्व कामात यश मिळेल.


कुंभ:-(गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

धार्मिक आणि सामाजिक कार्यात रस वाढेल. बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल.


मीन:-(दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

दिवस मध्यम आहे. घरगुती कामांवर लक्ष द्या. चुका टाळा. संयम आवश्यक आहे.


३ एप्रिल रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर मंगळ आणि हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. मंगळ स्पष्टवक्ता, शीघ्रकोपी, अतिश्रम करणारा तर हर्षल अकल्पित घटना घडवून आणणार आहे. तुम्ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात आणि सतत प्रगती करण्याचा तुम्हाला ध्यास लागलेला असतो. तुम्हाला धार्मिक गोष्टींबद्दल ओढ असली तरी कर्मकांडावर तुमचा विश्वास नसतो. तुम्ही दानशूर असतात मात्र त्याचे प्रदर्शन करतात. तुम्हाला न्यायाचे आवड असते. इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही सदैव तयार असतात. तुम्ही शीघ्रकोपी आहात. उत्साही आहात आणि सतत कार्यमग्न असतात. तुम्ही कारखाना चांगल्या प्रकारे चालवू शकतात. तुमचा स्वतंत्र बाणा आहे आणि तुमच्या अंगावर आलेली जबाबदारी तुम्ही योग्यपणे पार पाडू शकतात. इतरांनी तुमच्या कामात लुडबुड केलेली तुम्हाला आवडत नाही. तुमच्या डोकं जर तुम्ही शांत ठेवले तर जीवनात तुम्ही अधिक प्रगती करू शकाल. तुम्ही हट्टीपणा टाळला पाहिजे. तुम्ही शुद्ध प्रेम करणारे, दयावान आणि नीतिमान आहात. तुमच्यात आत्मविश्वास पुरेपूर भरलेला आहे. तुम्हाला इतरांच्या सल्ल्याची गरज पडत नाही. तुमचे वागणे रुबाबदार असून टापटीप आणि व्यवस्थित पण आढळतात. तुम्हाला उत्तम संभाषण शैली लाभलेली आहे. आणि तुम्ही बोलण्यात मोकळेढाकळे असतात. तुम्हाला मैदानी खेळांची आवड आहे. तुमचा दृष्टिकोन विशाल असतो आणि स्वभाव मिश्किल असतो. सहसा इतरांचा द्वेष किंवा मत्सर तुम्ही करत नाहीत.


व्यवसाय:- राजकीय नेता, मंत्री, जज, सचिव, धार्मिक गुरु, सल्लागार, सावकारी, जाहिरात, अभिनय, व्यायाम शिक्षक.


शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- किरमिजी.



राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)

Comments