अन्यायी वीजदरवाढ विरोधात सोमवारी व्यापारी-उद्योजकांची बैठक
बैठकीत ठरणार पुढील दिशा- उपस्थित राहण्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे आवाहन
कोल्हापूर दि. १८ सिटी न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील औद्योगिक वीजदर टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा दावा राज्य शासन करत असताना महावितरणने १० किलोवॅटपेक्षा जास्त सौरउर्जा निर्माण करणाऱ्या औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना ग्रिड सपोर्ट चार्ज लागू केला आहे. तसेच ‘टीओडी’ (टाइम ऑफ डे) बिलिंगचा झटका महावितरणने दिला आहे. परिणामी स्वखर्चाने सौर पॅनेल लावून तयार केलेली अतिरिक्त वीज रात्री वापरता येणार नाही. त्यामुळे सौर ग्राहकांना संध्याकाळी पुन्हा महावितरणची महागडी वीज विकत घ्यावी लागणार आहे.
सौर ग्राहकांची जनसुनावणी न घेताच वीज नियामक आयोगाने हा निकाल दिला आहे. वीज बिलात बचत करण्यासाठी सोलर सिस्टिम बसवणाऱ्या उद्योगांच्या बचतीच्या स्वप्नांवर यामुळे पाणी फिरणार आहे.
सदर वीजदरवाढीबाबत व्यापारी-उद्योजकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी *सोमवार दि. २० एप्रिल रोजी दुपारी ४.३० वा. कोल्हापूर चेंबरच्या कार्यालयात बैठक आयोजित केली आहे.* या बैठकीस महाराष्ट्र मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित कुलकर्णी (नाशिक) प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
तरी व्यापारी-उद्योजकांनी या सभेस उपस्थित रहावे असे आवाहन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
.jpeg)
Comments
Post a Comment