डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये द्वितीय

 डी. वाय. अभियांत्रिकीचा संघ राष्ट्रीय हॅकॅथॉनमध्ये द्वितीय


कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील हॅकॅथॉन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यांनी सादर केलेली ‘वेब बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम’ ही संकल्पना परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतली.

अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, आष्टा येथे आयोजित या स्पर्धेत देशभरातील ५० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील सुमारे ८०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाने मेडिकेअर क्षेत्रातील ‘वेब बेस्ड हेल्थ मॉनिटरिंग सिस्टम’ हा अभिनव प्रकल्प सादर करत द्वितीय क्रमांक मिळवला.

विजयी संघात संगणक अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षातील ऐश्वर्या देसाई, सारथी पाटील, आर्य सुतार, सुमित मुळे आणि स्वरूप पाल या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संघाला २० हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे तसेच संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. डॉ. राधिका ढणाल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


Comments