डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव १४ ते २४ एप्रिल दरम्यान

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव १४ ते २४ एप्रिल दरम्यान 




कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क 

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात मध्यवर्ती समितीच्या वतीने १४ ते २४ एप्रिल दरम्यान भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजीव आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे भरगच्च नियोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात अनुसूचित जाती-जमाती, ओबीसीसह सर्व घटकांतील नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे समितीकडून सांगण्यात आले.


या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार राजीव आवळे यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, समितीचे सचिव सुभाष देसाई, डी. जी. भास्कर, सोमनाथ घोडेराव आदी उपस्थित होते.

Comments