कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२६ निमित्त भव्य सांस्कृतिक महाजलसा; दसरा चौकात भीमगीतांचा जल्लोष
कोल्हापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२६ निमित्त भव्य सांस्कृतिक महाजलसा; दसरा चौकात भीमगीतांचा जल्लोष
कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात “प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२६” अंतर्गत भव्य सांस्कृतिक महाजलशाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रसिद्ध भीमगीत गायक व राष्ट्रप्रबोधनकार यांचा विशेष कार्यक्रम होणार आहे.
“भीमगीतांचा सांस्कृतिक महाजलसा – मी वादळवारा...” या विशेष कार्यक्रमाद्वारे आंबेडकरी चळवळीतील विचार, प्रेरणा आणि सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. विविध मान्यवरांची उपस्थितीही यावेळी अपेक्षित आहे.
हा कार्यक्रम गुरुवार, दि. २३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता येथे आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचे आयोजन समिती अध्यक्ष माजी आमदार राजीव आवळे, आर.पी.आय. (आ) जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, सचिव सुभाष देसाई, सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते डी. जी. भास्कर तसेच गुणवंत नागटिळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
कोल्हापूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या जयंती महोत्सवाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करत समाजात समता, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment