साठ वर्षांच्या अखंड सेवेला मानाचा मुजरा; तीन ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव

साठ वर्षांच्या अखंड सेवेला मानाचा मुजरा; तीन ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव



कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क 

 डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आणि जायंट्स  ग्रुप ऑफ रंकाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मिरजकर तिकटी परिसरातील तीन ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. तब्बल साठ वर्षे वृत्तपत्र वितरणाच्या सेवेत कार्यरत राहून समाजाला माहिती पुरवठा करणाऱ्या या विक्रेत्यांचा हृदयस्पर्श परिवाराचे पद्माकर कापसे यांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.



या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी या ज्येष्ठ विक्रेत्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या चिकाटी, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाचे कौतुक केले. वृत्तपत्र वितरण ही केवळ व्यवसायाची गोष्ट नसून समाजाशी जोडणारी महत्त्वाची कडी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

यावेळी आरोग्यमित्र पत्रकार राजेंद्र मकोटे, डिजिटल मीडिया संघटनेचे तेजस राऊत, जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळाचे अध्यक्ष तानाजी पाटील, बबिता जाधव, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, डॉ अश्विनी माळकर , इ सिटी न्यूज नेटवर्क चे सागर ठाणेकर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सत्कारमूर्तींनी आपल्या भावना व्यक्त करताना, वाचकांशी जुळलेले नाते आणि काळानुरूप बदलणाऱ्या माध्यम क्षेत्रातील अनुभव सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सत्कारमूर्तींना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

Comments