अनुज् चेस ॲकॅडमीच्या विद्यार्थ्याचे सांगलीत यश

  अनुज् चेस ॲकॅडमीच्या विद्यार्थ्याचे सांगलीत यश 





कोल्हापूर  १३ सिटी न्यूज नेटवर्क 

दि. १२ एप्रिल रोजी सांगली येथे पार पडलेल्या २२ व्या खुल्या FIDE रेटिंग जलद बुद्धिबळ स्पर्धेत अनुज् चेस ॲकॅडमीच्या विद्यार्थ्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.



अनुज् चेस ॲकॅडमीचा विद्यार्थी शिवराज उत्तम कामते (इयत्ता पहिली, डी. वाय. पाटील विद्यानिकेतन स्कूल, साळोखेनगर) याने ८ वर्षाखालील गटात ९ पैकी ३.५ गुणांची कमाई केली. विशेष म्हणजे, या ३.५ गुणांपैकी १.५ गुण त्याने रेटेड खेळाडूंविरुद्ध खेळून मिळवले, ही बाब त्याच्या गुणवत्तेची साक्ष देते.

या कामगिरीमुळे शिवराजचे आंतरराष्ट्रीय गुणांकन (FIDE Rating) लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.



शिवराजला बुद्धिबळ प्रशिक्षक व जिल्हा चेस असोसिएशन कोल्हापूरचे खजिनदार बाबूराव पाटील सर, तसेच बुद्धिबळ प्रशिक्षिका अनुष्का कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

शिवराजच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

Comments