ॲड. सुधीर जोशी यांची विधी आघाडी संयोजकपदी नियुक्ती


ॲड. सुधीर जोशी यांची विधी आघाडी संयोजकपदी नियुक्ती



कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क 


विश्व हिंदू परिषदेच्या विधी आघाडी-प्रकोष्ठाच्या नाशिक येथे पार पडलेल्या प्रांत बैठकीत ॲड. सुधीर जोशी यांची मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंच, कोल्हापूर येथे विधी आघाडी संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी ज्येष्ठ विधीज्ञ तथा सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथील ॲड. डॉ. अभिषेक अत्रे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

ॲड. अत्रे हे केंद्रिय विधी प्रकोष्ठाचे संयोजक असून भारत सरकारच्या कायदे तयार करणाऱ्या समितीचे प्रमुख सदस्य व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. विविध महत्त्वाच्या कायद्यांचे मसुदे तयार करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे.

नियुक्त झालेले ॲड. सुधीर जोशी हे कोल्हापूरमधील ज्येष्ठ विधीज्ञ असून विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री म्हणून त्यांनी प्रभावी काम केले आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. समाजातील सर्व घटकांना, विशेषतः जनजाती व वंचित घटकांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन करून गरजू व दुर्बल घटकांना मदत करणे, हा विधी प्रकोष्ठाचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

Comments