अभिषेक कोल्हापुरे यांचा गुणवंत कामगार म्हणून सन्मान

अभिषेक कोल्हापुरे यांचा गुणवंत कामगार म्हणून सन्मान



चॅनेल बी चा २४ वा वर्धापन दिन उत्साहात



कोल्हापूर १० सिटी न्यूज नेटवर्क 
पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीच्या बी चॅनलचा २४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने चॅनलमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी अभिषेक कोल्हापुरे यांचा “गुणवंत कामगार” म्हणून सन्मान करण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.



कार्यक्रमाला बी चॅनलचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, संपादक चारुदत्त जोशी तसेच भगीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक,बी चॅनल चे संपादक विजय कुंभार , इचलकरंजी प्रतिनिधी संजय कुडाळकर  मुख्य कॅमेरामन सुनील ठाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


अभिषेक कोल्हापुरे हे नेहमी हसतमुख राहून काम करणारे, तत्पर आणि जबाबदार मीडियातील प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि सातत्यपूर्ण कार्यामुळे त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे मान्यवरांनी सांगितले.

कार्यक्रमात बी चॅनलच्या २४ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यात आला तसेच भविष्यातही दर्जेदार आणि वेगवान पत्रकारितेचा ध्यास कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Comments