अस्थिर जागतिक परिस्थितीत व्यवसाय सुरक्षिततेसाठी इन्शुरन्सच प्रभावी कवच” - गोपाल शेळके
कोल्हापूर ०८ सिटी न्यूज नेटवर्क
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन 'स्मॅक' कोल्हापूर संचलित 'स्मॅक' एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल 'एसईपीसी' व दि इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन, कोल्हापूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने व संलग्न औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने “व्यवसायातील वाढते धोके आणि इन्शुरन्सद्वारे सुरक्षितता” या विषयावर स्मॅक भवन येथे सेमिनार झाला.
आजच्या बदलत्या औद्योगिक वातावरणात व्यवसायासमोरील जोखीम दिवसेंदिवस वाढत असून अचानक होणारे अपघात, कायदेशीर अडचणी, ग्राहकांच्या तक्रारी तसेच आर्थिक नुकसान यापासून संरक्षण मिळविण्यासाठी योग्य इन्शुरन्सची गरज अधोरेखित करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'एसईपीसी'चे चेअरमन आय. ए. पाटील यांनी केले. ते म्हणाले की, “आजच्या स्पर्धात्मक आणि अनिश्चित वातावरणात उद्योगांनी जोखीम व्यवस्थापनाला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक असून योग्य इन्शुरन्स कव्हरमुळे व्यवसाय दीर्घकालीन सुरक्षित राहू शकतो. एसईपीसी'चे तर्फे निर्यात विषयक दहा सत्रांची मालिका आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये उद्योगांना यापूर्वी डॉक्युमेंटेशन, रिस्क मिटीगेशन व इन्कॉटर्म्स या विषयांवरील सत्रे पार पडली आहेत.
ही सर्व सत्रे पूर्णपणे अटेंड केल्यास आयात-निर्यात क्षेत्रातील डिप्लोमा केल्यासारखे सखोल व व्यावहारिक ज्ञान उद्योगांना मिळणार आहे, असा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमाला उद्योगांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अधिकाधिक प्रतिनिधींचा सहभाग वाढला आहे”.
यावेळी निओ रिस्क मॅनेजमेंट अँड इन्शुरन्स ब्रोकर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर गोपाल शेळके व त्यांची टीम व्हाईस प्रेसिडेंट स्वानंद आरगडे व असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट पवन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गोपाळ शेळके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत उद्योगांसमोरील दायित्व जोखीम मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहार, करार प्रक्रिया व परदेशी न्यायक्षेत्रामुळे उद्योगांना नव्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. दायित्व जोखमींमध्ये थर्ड पार्टी नोटिस, न्यायालयीन खटले व कायदेशीर प्रक्रिया यांचा समावेश होतो. या जोखमींचे योग्य व्यवस्थापन न केल्यास उद्योगांच्या नफ्यावर व आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगले, उपाध्यक्ष भरत जाधव, खजिनदार बदाम पाटील, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे, सीआयआयचे दक्षिण महाराष्ट्र झोन चे अध्यक्ष वीरेंद्र पाटील, आयआयएफचे खजानिस सोहनी, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे कुशल सामाणी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
“इन्शुरन्सद्वारे व्यवसाय अधिक मजबूत व आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवता येतो,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
सेमिनारमध्ये उद्योगांना विविध इन्शुरन्स प्रकार, कव्हरेज पर्याय, कायदेशीर नियम व जोखीम कमी करण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
हा सेमिनार विशेषतः इन्शुरन्सद्वारे व्यवसायाचे प्रभावी संरक्षण कसे करावे, यावर केंद्रित होता.
यावेळी स्मॅकचे स्वीकृत संचालक भीमराव खाडे, निमंत्रित सदस्य चंद्रशेखर करपे, प्रवीण पटेल, अजिंक्य तळेकर, एईसीपीसीचे कमिटी मेंबर नामदेव पाटील, मिहीर कामत, तेजस ठाकूर तसेच उद्योजक शंतनू जाधव, पियुष जाधव, उद्योग समूहाचे ओनर्स, भागीदार, डायरेक्टर, सीईओ, जनरल मॅनेजर, सीएफओ, व्यवस्थापन प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करण्यात आले.

Comments
Post a Comment