कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी पदभार स्वीकारला
कोल्हापूर ०७ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार नूतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून अधिकृतरित्या स्वीकारला.
यावेळी महापौर रूपाराणी निकम यांनी डॉ. भारूड यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. भारूड यांनी प्रशासनातील कामकाजाला गती देत नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. तसेच शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि प्रलंबित विकासकामांना प्राधान्य देत पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


Comments
Post a Comment