वाढदिवसानिमित्त ए. वाय. पाटील यांची श्री एकमुखी दत्त मंदिराला भेट
कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क
राधानगरीचे लोकनेते, राष्ट्रवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आज कोल्हापुरातील श्री एकमुखी दत्त मंदिराला भेट देत दर्शन घेतले.
या प्रसंगी मंदिरात धार्मिक वातावरणात पूजा-अर्चा करण्यात आली. पाटील यांनी समाजाच्या प्रगतीसाठी आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
यावेळी श्री एकमुखी दत्त देवस्थान समितीचे मठाधिपती संतोष गिरिगोसावी हेही उपस्थित होते. त्यांनी पाटील यांना आशीर्वाद देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनीही पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

Comments
Post a Comment