मनसेच्या पदाधिकाऱ्यावर खंडणीचा आरोप

 मनसेच्या पदाधिकाऱ्यावर खंडणीचा आरोप 



   कोल्हापूर ११ सिटी न्यूज नेटवर्क 

 करवीर पंचायत समिती आरोग्य अधिकारी डॉ.उत्तम मदने यांनी कोल्हापुरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) एका पदाधिकाऱ्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे. बालिंगा येथील एका मल्टी स्पेशालिटी  हॉस्पिटलच्या मान्यतेच्या प्रक्रियेवरून हा वाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित हॉस्पिटलच्या मान्यतेसंदर्भात प्रशासकीय प्रक्रिया सुरू असताना मनसेच्या पदाधिकाऱ्याने हस्तक्षेप करत आर्थिक मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे आरोग्य विभागात तसेच स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



          डॉ.उत्तम मदने यांनी या संदर्भात संबंधित यंत्रणेकडे तक्रार दाखल केल्याचे सांगितले जात आहे. या आरोपांनंतर संबंधित मनसे पदाधिकाऱ्याची बाजू काय आहे, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.


दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. पोलिस प्रशासन तसेच संबंधित विभाग या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून लवकरच पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

Comments