पाणी हेच जीवन… लोकांची तहान भागवणे हेच कर्तव्य

  पाणी हेच जीवन… लोकांची तहान भागवणे हेच कर्तव्य


कोल्हापूर १२ सिटी न्यूज नेटवर्क 

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेमध्ये नागरिकांची तहान भागवण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत “एक मदतीचा हात” या उपक्रमांतर्गत पाणपोईचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

रौनक फौंडेशन, डी. एम. मेडिकल व Centre Applied Research in Education (C.A.R.E.) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील गरजू व प्रवाशांना थंड पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही पाणपोई सुरू करण्यात आली.





या पाणपोईचे उद्घाटन इयत्ता ४ थी शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये कु. शिवश्री दरवान, कु. रिद्धी गुरव, कु. स्पृहा सुतार, कु. स्पृहा पाटील, कु. वेदिका सुतार व कु. वेदांती सुतार या विद्यार्थिनींचा सहभाग होता.

या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे १० वीचे विद्यार्थी कु. अमेय सुतार व कु. शौर्य सुतार यांचेही विशेष योगदान लाभले.

या उपक्रमामुळे उन्हाळ्यातील कडक उन्हात प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार असून, सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव या माध्यमातून अधोरेखित करण्यात आली. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुढील काळातही अशा सामाजिक कार्यांची अपेक्षा व्यक्त केली.







Comments