क्रांतीसूर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवात अर्थनीतीवर व्याख्यान
क्रांतीसूर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवात अर्थनीतीवर व्याख्यान
कोल्हापूर १२ सिटी न्यूज नेटवर्क
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत वक्ते पी. एस. कांबळे यांनी डॉ. आंबेडकरांच्या अर्थनीतीवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी पी. एस. कांबळे यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांच्या अर्थनीतीचे महत्त्व अधोरेखित करताना ते केवळ सामाजिक क्रांतिकारक नसून प्रख्यात अर्थतज्ज्ञ असल्याचे नमूद केले. त्यांनी Columbia University येथे शिक्षण घेत भारताच्या आर्थिक रचनेचे सखोल विश्लेषण केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
ब्रिटिशकालीन आर्थिक धोरणांवर टीका करताना भारतातील शेती व औद्योगिक विकासावर झालेल्या परिणामांचा त्यांनी ऊहापोह केला. “एक व्यक्ती, एक मत” ही लोकशाहीची संकल्पना तसेच केंद्र-राज्य आर्थिक संतुलनासाठी वित्त आयोगाची गरज यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
आजच्या काळातील आर्थिक विषमता, बेरोजगारी आणि ग्रामीण-शहरी दरी लक्षात घेता डॉ. आंबेडकरांचे विचार अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. समावेशक विकास आणि सामाजिक-आर्थिक न्यायासाठी त्यांच्या अर्थनीतीची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी माजी आमदार राजू आवळे (अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव), माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उत्तम कांबळे, सुभाष देसाई, दुर्वास कदम, डी. जी. भास्कर यांच्यासह मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
---

Comments
Post a Comment