ग्रामीण आरोग्य सेवेला बळ देण्याचा संकल्प; धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात डॉक्टरांचा सन्मान
कोल्हापूर, १३ सिटी न्यूज नेटवर्क
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळायला हव्यात. डॉक्टरांनी आपल्या मागण्या शासन दरबारी मांडाव्यात आणि त्या सोडविण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे फुलेवाडी येथील सभागृहात आयोजित धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक रणादिवे यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देताना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करत, त्या दूर करण्यासाठी संघटनेमार्फत सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.
यावेळी श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते डॉ. वसंत पाटील (बालिंगा) यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच १५ डॉक्टरांना धन्वंतरी पुरस्कार प्रदान करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
🏅 धन्वंतरी पुरस्कारप्राप्त डॉक्टर :
शिवाजी मगदूम (करवीर), नितीन माने (पन्हाळा), सुभाष पाटील (शाहूवाडी), राजेश कुंभार (हातकणंगले), सुहास कांबळे (शिरोळ), किरण खोराटे (गडहिंग्लज), सुभाष पाटील (चंदगड), प्रवीण निंबाळकर (आजरा), सचिन सुतार (भुदरगड), अमित काळेबेरे (राधानगरी), शरद पाटील (गगनबावडा), रवींद्र मगदूम (कागल), बाबूराव पाटील (निगवे खालसा), श्रीनिवास चोपडे (पुनाळ), प्रकाश पाटील (सांगरूळ).
🎖 विशेष सत्कार :
राजकुमार पाटील (कोल्हापूर), बहुद्दीन मणेर (बालिंगा), प्रिया पाटील (दोनवडे).
कार्यक्रमाचे स्वागत असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी बहुद्दीन मणेर यांनी केले. यावेळी रणजित देसाई, सरदार पाटील, विठ्ठल पाटील, सुनील देसाई, संजय केटफळे, अनिल कांबळे, राजेश पाटील, जयवंत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments
Post a Comment