कोल्हापूरात आज श्री अंबाबाई रथोत्सव; भव्य रोषणाई, LED स्क्रीन आणि रिल्स स्पर्धेचे आकर्षण
कोल्हापूर, ता. २ सिटी न्यूज नेटवर्क
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर येथे परंपरेनुसार जोतिबा यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी साजरा होणारा श्री अंबाबाईचा रथोत्सव आज (गुरुवारी) मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास रथोत्सवाला प्रारंभ होणार असून, भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.
रथोत्सवानिमित्त श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट तर्फे रथाचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. महाद्वार चौक ते जोतिबा रोड या संपूर्ण रथमार्गावर आकर्षक रोषणाई करण्यात येणार असून, ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांना रथोत्सवाचा सोहळा अधिक जवळून अनुभवता येणार आहे.
यंदा रथोत्सवात डिजिटल माध्यमांचा वापर करत ट्रस्टतर्फे रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी स्पर्धकांनी रथोत्सवाचे ५० सेकंदांपर्यंतचे आकर्षक रील तयार करून “mahalaxmi annachhatra” या इन्स्टाग्राम पेजसोबत कोलॅब्रेशन करावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले आहे.
भव्य सोहळा, पारंपरिक उत्साह आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेला हा रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Kolhapur Ambabai Rathotsav 2026, Mahalaxmi Temple Kolhapur Rath Yatra, Kolhapur Festival News, Ambabai Rathotsav Live, Kolhapur Religious Event
.jpeg)
Comments
Post a Comment