डी वाय पाटील विद्यापीठाचे दोन संशोधक देशातील ‘टॉप 10’ मध्ये; डॉ. सी. डी. लोखंडे तिसरे, डॉ. प्रमोद पाटील आठव्या स्थानी
डी वाय पाटील विद्यापीठाचे दोन संशोधक देशातील ‘टॉप टेन’ मध्ये; डॉ. सी. डी. लोखंडे तिसरे, डॉ. प्रमोद पाटील आठव्या स्थानी
कोल्हापूर ०७ सिटी न्यूज नेटवर्क
पदार्थ विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन कार्यामुळे येथील दोन संशोधकांनी देशातील अव्वल संशोधकांच्या यादीत ‘टॉप 10’ मध्ये स्थान मिळवून विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन मूल्यमापन संस्था Research.com यांनी जाहीर केलेल्या मानांकनात सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी स्टडीजचे अधिष्ठाता यांनी देशात तिसरे, तर संशोधन संचालक यांनी आठवे स्थान पटकावले आहे.
Research.com च्या अहवालानुसार, देशातील सर्वोत्तम संशोधकांची निवड डी-इंडेक्स, संशोधनपत्रांची गुणवत्ता, संदर्भसंख्या आणि संशोधन क्षेत्रातील प्रभाव या निकषांवर करण्यात आली. डॉ. चंद्रकांत डी. लोखंडे यांचा डी-इंडेक्स 108 असून त्यांच्या संशोधन कार्याला 41 हजार 764 हून अधिक संदर्भ प्राप्त झाले आहेत. जागतिक क्रमवारीत त्यांचा 725 वा क्रमांक लागला आहे. तर डॉ. प्रमोद एस. पाटील यांचा डी-इंडेक्स 91 असून त्यांच्या संशोधनाला 29 हजार 160 हून अधिक संदर्भ मिळाले आहेत. जागतिक स्तरावर त्यांना 1554 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
याचबरोबर विद्यापीठाचे संशोधक यांनीही या यादीत 185 वे स्थान मिळवले आहे. त्यांचा डी-इंडेक्स 49 असून त्यांच्या संशोधनाला 6941 संदर्भ प्राप्त झाले आहेत.
डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाने संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे. विद्यापीठातील संशोधकांनी ऊर्जा, नॅनोतंत्रज्ञान, सुपरकॅपॅसिटर, सौरऊर्जा, बॅटरी तंत्रज्ञान आणि आधुनिक पदार्थ विज्ञान या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संशोधन केले आहे. अनेक संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून विद्यापीठाच्या नावावर अनेक पेटंट नोंदविण्यात आले आहेत. संशोधनाधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख तंत्रज्ञान विकासावर विद्यापीठाचा विशेष भर राहिला आहे.
या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी पाटील यांनी संशोधकांचे अभिनंदन करताना सांगितले की, “डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाने नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संशोधन आणि नवसंकल्पनांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. डॉ. सी. डी. लोखंडे आणि डॉ. प्रमोद एस. पाटील यांनी मिळवलेले हे यश विद्यापीठासाठी अभिमानास्पद असून संशोधन कार्याला आणखी गती मिळेल.”
यंदाच्या मानांकनासाठी Research.com ने OpenAlex, CrossRef यांसह विविध आंतरराष्ट्रीय डेटाबेसमधील माहितीचा आधार घेतला. देशातील 263 मटेरियल्स सायन्स संशोधकांचा अभ्यास करून ही यादी तयार करण्यात आली असून संशोधकांच्या शैक्षणिक योगदानासोबतच त्यांच्या संशोधनाचा समाज आणि विज्ञान क्षेत्रावर झालेला प्रभावही विचारात घेण्यात आला.
या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष , विश्वस्त , , कुलगुरू तसेच कुलसचिव यांनी संशोधकांचे अभिनंदन केले.

Comments
Post a Comment