जी एच रायसोनी स्मृती 19 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धा : दिशा पाटील व अथर्व तावरे अजिंक्य
![]() |
| सर्व बक्षीस विजेते सोबत मान्यवर पाहुणे पंच व संयोजक |
कोल्हापूर ३ सिटी न्यूज नेटवर्क
चेस असोसिएशन कोल्हापूरतर्फे आयोजित जी एच रायसोनी स्मृती 19 वर्षाखालील जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा अयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर येथे उत्साहात संपन्न झाली. जिल्ह्यातील होतकरू बुद्धिबळपटूंनी सहभाग घेत स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला.
या स्पर्धेत मुलींच्या गटात जयसिंगपूरच्या दिशा पाटील हिने पाच पैकी साडेचार गुण मिळवत अजिंक्यपद पटकावले. तिच्याच पाठोपाठ सिद्धी कर्वे (जयसिंगपूर) हिने साडेतीन गुणांसह उपविजेतेपद मिळवले, तर नांदणीच्या संस्कृती सुतार हिने तृतीय स्थान पटकावले. हर्षदा सूर्यवंशी पाटील हिने चौथ्या स्थानावर मजल मारली.
मुलांच्या गटात इचलकरंजीचा अथर्व तावरे याने सहापैकी साडेपाच गुण मिळवत अजिंक्यपदावर नाव कोरले. जयसिंगपूरचा हित बलदवा पाच गुणांसह उपविजेता ठरला. सर्वेश पोतदार व प्रणव मोरे (दोघेही कोल्हापूर) यांनी अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान मिळवले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ दिलीप पोतदार, अर्चना मोरे, सुप्रिया पोर्लेकर व विद्या घोरपडे यांच्या हस्ते पार पडला. विजेत्यांना एकूण ६,००० रुपयांचे रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.
वयोगटानुसार विशेष विजेते:
- १५ वर्षाखालील: राधेश्वर ठोंबरे, सृष्टी जोशीराव
- १३ वर्षाखालील: अर्णव पोर्लेकर, आरोही बनसोडे
- ११ वर्षाखालील: वन्शील ठक्कर, नारायणी घोरपडे
- ९ वर्षाखालील: अद्वैत कुलकर्णी
- ७ वर्षाखालील: शिवराज कामटे
या स्पर्धेतून १५ ते १७ मे दरम्यान पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय 19 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचा अधिकृत संघ निवडण्यात आला आहे.
निवड झालेला संघ:
- मुले: अथर्व तावरे, हित बलदवा, सर्वेश पोतदार, प्रणव मोरे
- मुली: दिशा पाटील, सिद्धी कर्वे, संस्कृती सुतार, हर्षदा सूर्यवंशी पाटील
या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना राज्यस्तरावर आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळाली असून, पुढील स्पर्धांसाठी उत्साह निर्माण झाला आहे.

Comments
Post a Comment