चित्रकर्मी क्रिकेट लीग 2026 पर्व-4 ला उत्साहात सुरुवात

 

चित्रकर्मी क्रिकेट लीग 2026 पर्व-4 ला उत्साहात सुरुवात



कोल्हापूर १२ सिटी न्यूज नेटवर्क 

 चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांना एकत्र आणणाऱ्या “चित्रकर्मी क्रिकेट लीग 2026 – पर्व 4” ला मंगळवार दि. 12 मे रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. कळंबा येथील कॅसल स्पोर्ट्स टर्फ येथे 12 आणि 13 मे 2026 दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.



या लीगच्या उद्घाटन समारंभाला कोल्हापूर महानगरपालिकेचे  उपमहापौर अक्षय जरग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा कुडची, वॉटर एटीएमचे अध्यक्ष रमेश चावरे, सर्वेश जाधव, ट्रॉफी व रोख रक्कम देणगीदार अमर मठपती, निर्मिती व्यवस्थापक व निर्माते सुनील चौगले, आर्ट डायरेक्टर संतोष फुटाणे तसेच दिग्दर्शक संदीप पाटील, अभिनेते स्वप्नील राजशेखर, आनंद काळे आदी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. उपमहापौर अक्षय जरग आणि अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या हस्ते क्लॅप देऊन सामन्यांना सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी सर्व संघांना शुभेच्छा देत खेळाडूंचा उत्साह वाढविला.

या लीगमध्ये “सोलर बेबी लाईट”, “रॉयल कोरिओग्राफर”, “मास्टर ऑफ आर्ट्स”, “नटसम्राट गोल्ड”, “DOP शूटर”, “रंगीला मेकअप”, “प्रोडक्शन टायगर”, “डायरेक्टर स्वॅग”, “नटसम्राट स्टार” आणि “रंगीला मेकअप चॅम्पियन” या संघांचा सहभाग आहे.

स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरला तो चित्रपट व्यवसायातील महिलांचा “सौंदर्य रणरागिनी” हा संघ. महिला कलाकार आणि तंत्रज्ञांनी मैदानात उतरून खेळाला वेगळी रंगत आणली.

या सोहळ्यास चित्रपट व्यवसायातील निर्माते, तंत्रज्ञ, कामगार, कलाकार, संघप्रमुख आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments