आजचे राशीभविष्य
शुक्रवार, १ मे २०२६
वैशाख पौर्णिमा
वसंत ऋतू
पराभव नाम संवत्सर
शके १९४८, संवत २०८२
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
(संपर्क – 8087520521)
⏰ राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“सकाळी १०.०० नंतर चांगला दिवस आहे”
*बुद्ध पौर्णिमा, महाराष्ट्र दिन, वैशाख स्नान समाप्ती*
चंद्र नक्षत्र – स्वाती
आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ (विष्टी करण शांती)
ग्रहयोग:
रवी प्रतियुती चंद्र, शुक्र लाभ शनी
१ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र, बुध आणि रवी या तीन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही स्वतंत्र विचाराचे आहात. तुमचा सतत बदल करण्याकडे ओढा असतो. तुम्ही एकाच गोष्टीत फार काळ रमत नाहीत. आपल्या आयुष्यात काहीतरी सनसनाटी असावा असं तुम्हाला नेहमी वाटत असतं. तुमच्या कामात सातत्य असतं आणि तुम्ही कार्यक्षम आहात. तसे तुम्ही प्रेमळ आहात. मित्रांबद्दल तुम्हाला सहानुभूती आणि आदर असतो. तुम्ही कलासक्त असतात. सौंदर्याचे भोक्ते असतात. अनेकदा सुगंधी द्रव्ये वापरणे तुम्हाला आवडते. तुम्हाला प्रवासाची देखील आवड आहे. तुम्ही इतरांना चांगला सल्ला देऊ शकतात. उच्चप्रतीचे कपडे, दागिने, वाहन, घर तुम्ही वापरत असतात. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुम्ही बुद्धिमान आहात आणि तुम्हाला गणित, शास्त्र आणि व्यापार यांची आवड आहे. तुम्ही झटपट काम करतात. तुमचा कामाचा वेग जास्त असतो. एखादे काम हाती घेतल्यावर तुम्ही त्याचे पूर्वनियोजन उत्तम प्रकारे करतात. तुम्हाला गूढ गोष्टींची आवड असते. तुम्ही प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे आहात. आळशीपणा तुम्हाला आवडत नाही. तुमची इच्छाशक्ती दांडगी असते. संशोधन करण्यात तुम्हाला रस असतो. तुमच्या बोलण्यात मोहक पणा आहे. लोकांना तुमचे बोलणे आवडते. तुम्ही तर्कशुद्ध विचार करतात आणि एखाद्या गोष्टीचा उत्तम विश्लेषण करू शकतात.
व्यवसाय:- तुम्ही एकाच व्यवसायात रमत नाहीत. व्यवसायात बदल करत असतात. पुस्तक विक्रेता, आयात-निर्यात, वृत्तपत्र व्यवसाय, इंटरनेट, इंटरियर डेकोरेटर, डिपार्टमेंटल स्टोअर, केमिस्ट, इंजिनियर.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शुक्रवार.
शुभ रंग:- सोनेरी.
शुभ रत्ने:- माणिक, पाचू, मोती.
♈ मेष:-(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
रवी-चंद्र प्रतियुतीमुळे मानसिक ताण जाणवू शकतो. सकाळी सावध राहा. दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या.
♉ वृषभ:-(इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
शुक्राचा लाभ शनीमुळे स्थैर्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
♊ मिथुन:-(का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
कामात प्रगती होईल. नवीन संधी मिळतील. मित्रांचा सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.
♋ कर्क:-(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
घरगुती वातावरण शांत राहील. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. मानसिक समाधान मिळेल.
♌ सिंह:-(मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
सकाळी काही अडचणी येऊ शकतात. दुपारनंतर यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल.
♍ कन्या:-(टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
कामात सातत्य ठेवा. आर्थिक लाभ संभवतो. आरोग्याकडे लक्ष द्या. संयम आवश्यक आहे.
♎ तुळ:-(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
तुमच्या राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन संधी मिळतील. व्यक्तिमत्व खुलून दिसेल.
♏ वृश्चिक:-(तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
संमिश्र ग्रहमान आहे. वाद टाळा. संयमाने वागल्यास यश मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
♐ धनु:-(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. आर्थिक लाभ होईल.
♑ मकर:-(भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामाचा ताण जाणवेल. नियोजन करून काम करा. कुटुंबातून सहकार्य मिळेल.
♒ कुंभ:-(गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
मित्रांचा सहकार्य मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. प्रवासाचे योग आहेत.
♓ मीन:-(दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
मन प्रसन्न राहील. सर्जनशील कार्यात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.
— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
📞 8087520521
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


Comments
Post a Comment