बुद्ध पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरात अन्नदानाचा उपक्रम; माजी आमदार राजू आवळे यांचा सहभाग
कोल्हापूर ०१ सिटी न्यूज नेटवर्क
बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने कोल्हापूर थाळी येथे गरजू नागरिकांसाठी अन्नदानाचा उपक्रम उत्साहात पार पडला. विविध सामाजिक संघटना तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी एकत्र येत हा उपक्रम राबवला.
या उपक्रमात माजी आमदार राजू आवळे (अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून गरजू नागरिकांना अन्नाचे वाटप केले.
माजी आमदार राजू आवळे (अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव), यांच्यासह मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
अन्नदान उपक्रमांतर्गत गरजू, वंचित आणि रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांना प्रेमाने अन्नपदार्थांचे वितरण करण्यात आले. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करत सर्वांना अन्न मिळेल याची विशेष काळजी घेतली.
यावेळी उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा प्रकारच्या सामाजिक कार्यामुळे समाजात एकोपा आणि मानवतेची भावना वृद्धिंगत होते, असे मत व्यक्त केले.
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या अन्नदान उपक्रमामुळे अनेक गरजू नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.

Comments
Post a Comment