स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांच्या सन्मानाच्या गोष्टी विरोधकांनी आम्हाला शिकवू नयेत - धैर्यशील देसाई
कोल्हापूर २१ सिटी न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार महादेवरावजी महाडिक यांच्या बदनामीचे षडयंत्र विरोधकांकडून सुरू आहे. त्या संदर्भात खुलासा करताच स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांचा अपमान केल्याची आवई विरोधकांनी उठवली आहे. वास्तविक पाहता चुयेकर साहेबांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर वाटचाल करत माजी आमदार महादेवरावजी महाडिक, स्वर्गीय आमदार पी एन पाटील, अरुण नरके यांनी गोकुळ दूध संघ नावारुपाला आणला. चुयेकर साहेबांच्या हयातीतच त्यांचा पूर्णाकृती पुतळा गोकुळ कार्यस्थळावर उभारून आम्ही त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यामुळे चुयेकर साहेबांच्या सन्मानाच्या गोष्टी आम्हाला शिकवू नयेत अशी टीका धैर्यशील देसाई यांनी केली.
स्वतः स्व.चुयेकर साहेब आणि स्व.जयश्रीताई पाटील चुयेकर यांनी अखेरच्या श्वासापर्यंत महाडिक साहेब आणि पी एन पाटील साहेब यांच्यावरच विश्वास दाखवत गोकुळच्या कारभारात सहकार्य केले. या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करत विरोधकांकडून महाडिक साहेबांवर जे आरोप होत आहेत ते सर्वस्वी खोटे आणि बिनबुडाचे असल्यामुळे त्याविषयी गोकुळचा माजी संचालक म्हणून खुलासा केला तर खुशमस्करी कशी झाली? असा सवाल देसाई यांनी केला.
गोकुळच्या निवडणुकीला अजून बराच अवधी असल्यामुळे माझ्या तिकिटाची काळजी इतरांनी करू नये असा सल्लाही धैर्यशील देसाई यांनी विरोधकांना दिला.
कोल्हापूर आईस अँड कोल्ड स्टोरेज, गायत्री आईस कोल्ड स्टोरेज आणि व्यंकटेश्वरा गुड्स मूव्हर्स या कंपन्यांनी गोकुळ नाही घालून दिलेल्या नियम आणि अटींची पूर्तता करूनच सेवा पुरवली आहे. उच्च न्यायालयानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे त्यामुळे विरोधकांनी टीका करणे थांबवावे असे आवाहन धैर्यशील देसाई यांनी केले आहे.
.jpg)
Comments
Post a Comment