आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

🌞 बुधवार, १३ मे २०२६




वैशाख कृष्ण एकादशी / द्वादशी. वसंत ऋतू. पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क – 8087520521)


⏰ राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


🌙 चंद्र नक्षत्र – उत्तराभाद्रपदा

🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – मीन. विषकुंभ योग शांती. 

☀️ आजचा दिवस – उत्तम दिवस. *अपरा एकादशी*


🌟 विशेष योग – चंद्र युती शनी, चंद्र लाभ हर्षल, चंद्र युती नेपच्यून, बुध लाभ गुरू

👉 विचारपूर्वक घेतलेले निर्णय, अनुभव आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर आज महत्त्वाची कामे यशस्वी होतील. अध्यात्म, नियोजन आणि आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस.



♈ मेष (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

कामात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांची मदत लाभेल. आत्मविश्वासाने पुढे जा.


♉ वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आर्थिक लाभाचे संकेत आहेत. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंद राहील.


♊ मिथुन (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

बुधाच्या शुभ प्रभावामुळे बुद्धी आणि संवाद कौशल्य वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


♋ कर्क (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

मन संवेदनशील राहील. भावनिक निर्णय टाळा. खर्चावर नियंत्रण आवश्यक.


♌ सिंह (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

मित्र आणि सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.


♍ कन्या (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

कामात प्रगती होईल. नियोजन केलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याकडे लक्ष द्या.


♎ तुळ (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील.


♏ वृश्चिक (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

गुप्त योजना यशस्वी होतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. संयम आवश्यक.


♐ धनु (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

भागीदारीच्या कामात लाभ मिळेल. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल.


♑ मकर (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

कामाचा ताण जाणवेल पण यश निश्चित मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या.


♒ कुंभ (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

सर्जनशील कामात यश मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. नवीन संधी लाभदायक ठरतील.


♓ मीन (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

चंद्र राशीत असल्याने मानसिक समाधान मिळेल. आध्यात्मिक आणि कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.


📌 कुंडलीवरून करिअर, लग्न, व्यवसाय व इतर सखोल मार्गदर्शनासाठी तसेच “राशीभाव” या कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी संपर्क करा.

📞 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521

Comments