जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा नऊ वर्षाखालील मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुलकर्णी व शनाया मालाणी अजिंक्य तर अथर्वराज ढोले व नक्षत्रा कांबळे उपविजेते
जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा नऊ वर्षाखालील मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुलकर्णी व शनाया मालाणी अजिंक्य तर अथर्वराज ढोले व नक्षत्रा कांबळे उपविजेते
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
चेस असोसिएशन कोल्हापूर ने अयोध्या टॉवर दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या जी एच रायसोनी स्मृती कोल्हापूर जिल्हा नऊ वर्षांखालील मुला मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम पाचव्या फेरीनंतर मुलांच्या गटात कोल्हापूरच्या अद्वैत कुलकर्णीने पाच पैकी पाच गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. कोल्हापूरच्याच अथर्वराज ढोले ने साडेचार गुणासह उपविजेतेपद मिळविले. मुलींच्या गटात इचलकरंजीच्या शनाया मालानी ने पाच पैकी पाच गुण घेत विजेतेपद मिळवले तर कोल्हापूरची नक्षत्रा कांबळे चार गुणासह उपविजेती ठरली. या चौघांची निवड छत्रपती संभाजीनगर येथे दोन व तीन जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य नऊ वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी झाले असून ते कोल्हापूर जिल्ह्याचे अधिकृत प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचा बक्षीस समारंभ आरती मोदी, मालानी, उमेश कांबळे व उत्तम कामते यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी भरत चौगुले, मनिष मारुलकर व सचिन वणीरे उपस्थित होते.
इतर बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे मुले:- अर्णव वरुटे इचलकरंजी, शिवांश सुतार इचलकरंजी, रियांश गिरगावकर कोल्हापूर व शिवराज कामते कोल्हापूर मुली:- तनिषा चौगुले कोल्हापूर, अवनी सूर्यवंशी इचलकरंजी, जिजा व्यापारी कोल्हापूर व राजमुद्रा भोसले कोल्हापूर , बक्षीस विजेत्यांना एकूण चार हजार रुपये रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.

Comments
Post a Comment