शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचगंगा नदीची भक्तीभावाने आरती
कोल्हापूर १९ सिटी न्यूज नेटवर्क
शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचगंगा आरती भक्त मंडळाच्या वतीने पंचगंगा नदीची आरती अत्यंत भक्तीभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. नदीकाठ परिसर “हर हर महादेव” आणि आरतीच्या जयघोषाने भक्तिमय झाला होता.
यावेळी पंचगंगा आरती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ कुंभार, सुधाकर भांदिगरे, राजेंद्र बुचडे, पप्पू शेठ भाट यांच्यासह अनेक भाविक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पंचगंगा मातेला अभिवादन करत समाजात सुख, समृद्धी व शांततेची प्रार्थना केली.
किशोर घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे धार्मिक व सामाजिक वातावरण निर्माण झाले असून, उपस्थित भाविकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.


Comments
Post a Comment