कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ने गौरव

 

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ने गौरव

डॉ .संजय डी. पाटील यांना ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ने त्यांना सन्मानित करताना रिचर्ड लिवसी. समवेत प्रवीण मित्तल, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. ए. के. गुप्ता, वृंदन जाधव


सिम्युलेशन आधारित वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क 

 सिम्युलेशन आधारित वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करणाऱ्या कार्याबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती यांना प्रतिष्ठेच्या ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. याचवेळी ‘अ पार्टनरशिप बिल्ट ऑन व्हिजन’ हा विशेष पुरस्कारदेखील त्यांना देण्यात आला.

डॉ. संजय डी. पाटील यांनी सिम्युलेशन शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य आणि डी. वाय. पाटील अभिमत विद्यापिठाच्या या सिम्युलेशन सेंटरची जागतिक पातळीवर ओळख निर्माण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी ‘सेलिब्रिटिंग अ व्हीजन’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र- कुलपती तथा विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, एलिव्हेट हेल्थकेअरचे नॅशनल हेड प्रवीण मित्तल, डी वाय पाटील विद्यापीठ मुंबईचे प्रोजेक्ट हेड वृंदन जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

सिम्युलेशन शिक्षण संचालिका यांनी प्रास्ताविक केले, तर सेंटर हेड यांनी गेल्या पाच वर्षांतील सिम्युलेशन सेंटरच्या प्रगतीचा आढावा सादर केला. यावेळी सेंटरच्या प्रवासावरील विशेष चित्रफित दाखविण्यात आली.

यावेळी बोलताना रिचर्ड लिवसी यांनी डॉ. संजय डी. पाटील यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. “जगभरातील अनेक सिम्युलेशन सेंटर्स पाहिल्यानंतर डी. वाय. पाटील विद्यापीठातील सिम्युलेशन अँड स्किल सेंटर हे दूरदृष्टी, गुणवत्ता आणि नवोपक्रम यांचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे जाणवते,” असे ते म्हणाले. कोविड महामारीच्या कठीण काळात २०२० मध्ये सुरू करण्यात आलेले हे केंद्र आज जागतिक स्तरावर प्रेरणादायी मॉडेल ठरले असून, आतापर्यंत ३४ हजारांहून अधिक विद्यार्थी व प्रशिक्षणार्थींना याचा लाभ झाला आहे. तसेच १ लाख १३ हजार ६६१ तासांचे प्रशिक्षण आणि २ हजार ५८६ प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

“प्रत्येक मोठ्या प्रवासात कर्मचारी मेहनत करतात; मात्र त्यांना दिशा देण्याचे काम कॅप्टन करतो. वैद्यकीय शिक्षणाला आधुनिक सिम्युलेशन आधारित पद्धतीकडे नेणारे खरे कॅप्टन म्हणजे डॉ. संजय डी. पाटील,” असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी आपल्या मनोगतात डॉ. संजय पाटील यांच्या विद्यार्थीकेंद्री दृष्टीकोनामुळे विद्यापीठाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाल्याचे सांगितले.

सत्काराला उत्तर देताना डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, “सिम्युलेशन आधारित शिक्षणामुळे आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थी आणि डॉक्टर अधिक आत्मविश्वासाने उपचार करू शकतात. भविष्यातही जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आधुनिक शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.” त्यांनी लवकरच मेडिकल कॉलेजच्या नव्या २३ मजली इमारतीत एका पूर्ण मजल्यावर सिम्युलेशन सेंटरचा विस्तार करण्यात येणार असल्याची घोषणाही केली.

सिम्युलेशन सेंटरसाठी योगदान देणाऱ्या, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आणि संशोधन क्षेत्रात कामा करणाऱ्या अधिकारी प्राध्यापक यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही व्ही भोसले, डी. वाय. पाटील विद्यापीठ नवी मुंबईचे कुलसचिव डॉ. नितीन सिप्पी, सिम्युलेशन शिक्षण संचालिका डॉ. शिंपा शर्मा, सेंटर हेड डॉ. संकेत पाटील, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, सी.एच.आर.ओ श्रीलेखा साटम, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, उपअधिष्ठाता डॉ. पद्मजा देसाई यांच्यासह विद्यापीठाचे सर्व अधिकारी, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थांचे प्रमुख, विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुरुची पवार, डॉ. रश्मी बावडेकर, डॉ. अमृता पवार यांनी केले. तर आभार डॉ. राजेश ख्यालप्पा यानी मानले.

Comments