आजचे राशिभविष्य
🌞 सोमवार, १८ मे २०२६
अधिक ज्येष्ठ शुक्ल द्वितीया. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 (संपर्क - 8087520521)
⏰ राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
🌙 चंद्र नक्षत्र - रोहिणी / (सकाळी ११.३२ नंतर) मृग.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृषभ / (रात्री १०.०५ नंतर) मिथुन.
१८ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर मंगळ, बुध आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही सभ्य आणि मोठा मनाचे आहात. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. कोणत्याही जबाबदारी घेतल्यासतुम्हाला त्यात यश मिळते. प्रकृती सुदृढ असते. मात्र विकारांवर ताबा ठेवला पाहिजे. वक्तृत्व चांगले असते. स्वभाव हरहुन्नरी आणि स्वतंत्र असतो. तुम्ही आक्रमक स्वभावाचे, धाडसी, कामात तत्पर आणि प्रतिकार करण्यास सक्षम आहात. थोडक्यात म्हणजे तुम्ही लढाउ वृत्तीच्या आहात. कधी कधी तुम्ही स्वतः होऊनच एखादे भांडण उकरून काढतात. तुम्ही महत्वाकांक्षी आहात आणि एखाद्या विषयाचा पूर्ण अभ्यास करणे तुम्हाला आवडते. शक्यतो तुम्ही इतरांचा सल्ला मानत नाहीत. मनात घेतलेले काम तुम्ही पूर्ण करतातच. कधीकधी तुमच्यात उतावळेपणा असू शकतो. तुमच्याकडे उत्तम वक्तृत्व आहे. शिकवण्यात तुम्हाला खरा आनंद मिळतो. मोठेपणा, प्रतिष्ठान, मान सन्मान याला तुम्ही प्राधान्य देतात. वारसा हक्काने तुम्हाला संपत्ती मिळते. स्मरणशक्ती चांगली असते. सरकारी पातळीवर तुम्हाला मानसन्मान मिळतात. स्वतःची चूक मान्य करणे तुम्हाला फारसे पसंत नसते. शक्यतो तुम्ही इतरांवर टीका करणे टाळावे आणि नम्र राहावे यात तुमचा फायदा आहे. तुम्ही शक्तिवान असतात. तुम्हाला मैदानी खेळांची आवड आहे. तुम्ही काहीसे शीघ्रकोपी असले तरी अनेकदा स्वतःच्या मनावर ताबा ठेवू शकतात. तुमच्या विचारांमध्ये ठामपणा आहे. तुम्हाला प्राणी आणि निसर्ग यांची आवड आहे. तुम्ही मोठ्या अधिकाराच्या जागा सांभाळू शकतात.
व्यवसाय:- बेकरी, हॉटेल, दागिने विक्री, आर्किटेक्ट, गृहसजावट, मिल्ट्री, पोलीस, इंजिनीयर, लोखंड. बांधकाम क्षेत्र.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- तांबडा, पांढरा, पिवळा.
शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने वापरण्यापूर्वी कुंडलीचा अभ्यास करावा)
"आज आनंददायक आणि प्रगतीकारक दिवस आहे."
मेष:- अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. मित्रपरिवारातून चांगली मदत मिळेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल. प्रिय व्यक्तीसोबत वेळ आनंदात जाईल.
वृषभ:- तुमच्याच राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सुख लाभेल. नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. कला आणि संगीत क्षेत्रात विशेष यश मिळेल.
मिथुन:- संमिश्र दिवस आहे. खर्च वाढू शकतो. काही जुन्या आठवणी मनाला अस्वस्थ करतील. मात्र रात्रीनंतर चंद्र तुमच्या राशीत येत असल्याने आत्मविश्वास वाढेल. प्रवासात काळजी घ्या. धार्मिक कार्यात रस वाढेल.
कर्क:- लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजना यशस्वी होतील. मनातील चिंता कमी होऊ लागतील.
सिंह:- कर्मस्थानी चंद्र आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. थकवा जाणवू शकतो.
कन्या:- भाग्यस्थानी चंद्र आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. प्रवासाचे योग संभवतात. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
तुळ:- अष्टम स्थानी चंद्र आहे. संमिश्र अनुभव येतील. अचानक खर्च संभवतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या. जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात. शांत आणि संयमी राहिल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील.
वृश्चिक:- सप्तम स्थानी चंद्र आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यवसायिक भागीदारीत लाभ संभवतो. काही गैरसमज दूर होतील. नवीन संबंध प्रस्थापित होतील.
धनु:- षष्ठ स्थानी चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. महिलांकडून सहकार्य मिळेल. जुन्या अडचणी कमी होऊ लागतील.
मकर:- पंचम स्थानी चंद्र आहे. कला, साहित्य आणि सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. आर्थिक लाभाचे योग आहेत.
कुंभ:- चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती वातावरणात आनंद राहील. स्थावर मालमत्तेच्या कामात प्रगती होईल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. मानसिक समाधान लाभेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
मीन:- तृतीय स्थानी चंद्र आहे. धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांचे सहकार्य मिळेल. छोट्या प्रवासाचे योग संभवतात. लेखन, कला आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. हरवलेली वस्तू सापडू शकते.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments
Post a Comment