रविराज टूर्सतर्फे जगन्नाथ पुरी - कोणार्क - भुवनेश्वर सहलीचे आयोजन
कोल्हापूर २२ सिटी न्यूज नेटवर्क
धार्मिक आणि पर्यटनप्रेमींसाठी रविराज टूर्सतर्फे “जगन्नाथ पुरी - कोणार्क - भुवनेश्वर” या विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सहल १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणार असून भाविकांना ओडिशातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
या सहलीत चारधामांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पवित्र जगन्नाथ पुरी मंदिराचे दर्शन, जागतिक कीर्तीचे कोणार्क सूर्य मंदिर, चंद्रभागा बीच, आशियातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या चिल्का लेकमध्ये डॉल्फिन व फ्लेमिंगो दर्शन यांचा समावेश आहे. तसेच भुवनेश्वर येथील साक्षी गोपाल मंदिर, लिंगराज मंदिर, धौली शांती स्तूप आणि नंदकानन प्राणी संग्रहालयालाही भेट दिली जाणार आहे.
सहल खर्च प्रतिव्यक्ती ₹१४,५०० इतका असून पुणे ते पुणे तसेच सोलापूर ते सोलापूर असा प्रवास मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
सहलीमध्ये रेल्वे स्लीपर कोचमधून प्रवासाची सोय करण्यात आली असून मागणीनुसार ३ AC सुविधा उपलब्ध राहणार आहे. अंतर्गत फिरण्यासाठी AC वाहन, हॉटेलमध्ये निवास, चहा-नाश्ता व दोन्ही वेळचे जेवण, जगन्नाथपुरी मंदिर दर्शनासाठी रिक्षा खर्च तसेच कोणार्क सूर्य मंदिर आणि नंदकानन प्राणी संग्रहालयासाठी गाईडची सोय आयोजकांकडून करण्यात आली आहे.
इच्छुकांनी लवकरात लवकर आपले बुकिंग निश्चित करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
📞 संपर्क : ९४२२४११४०९९ / ९८९०८७६९९९

Comments
Post a Comment