आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

🌞 गुरुवार, २१ मे २०२६




अधिक ज्येष्ठ पंचमी / षष्ठी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

📞 (संपर्क - 8087520521)


⏰ राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज उत्तम दिवस आहे."

✨ गुरुपुष्यामृत योग - दिवसभर


🌙 चंद्र नक्षत्र - पुष्य.



🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क. (सकाळी १०.५९ पर्यंत गंड योग - अशुभ)


२१ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर बुध, गुरु आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ आहात. खास करून मुलांबद्दल विशेष प्रेम असते. आयुष्यात काहीसा उशिरा तुम्हाला मान मरातब मिळतो. तुमचा उत्साह दांडगा असतो आणि तुम्हाला प्रवासाची आवड असते. तुमच्या भोवती एकप्रकारचे वलय असते. लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. वारसा हक्काने तुम्हाला संपत्ती मिळते. तुम्ही लोकप्रिय असतात. तुम्हाला अध्यत्मिक प्रगतीची ओढ असते. तुम्ही इतरांना योग्य सल्ला देतात. सुखासीन जीवनाकडे तुमचा ओढा असतो. इतरांचे बारीक सारीक दोष तुम्ही सहज काढू शकतात. तुम्हाला सहजगत्या अधिकार आणि प्रतिष्ठा मिळते.  तुम्हाला उत्तम प्रतिष्ठा लाभते. तुम्ही ज्ञानी असतात आणि त्याबाबत तुमचा आत्मविश्वास दांडगा असतो. धर्माची तुम्ही चिकित्सा करतात मात्र तुम्ही नास्तिक नसतात. तुम्ही महत्वाकांशी आहात. शुद्ध प्रेम तुम्हाला आवडते. तुम्ही कायदा प्रेमी आहात. इतरांच्या भल्यासाठी तुम्ही मेहनत करतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. तुम्ही व्यवस्थित, काटेकोर आणि टापटीप आहात. तुमच्या कृतीमधून तुमचे उत्तम नियोजन दिसून येते. मैदानी खेळांची किंवा घरगुती खेळांचे तुम्हाला आवड असते. तुम्ही एखाद्या प्रकल्पाचे नियोजन उत्तम पणे करू शकतात. तुम्हाला गूढ विद्यांची आवड आहे. धर्म आणि तत्वज्ञान तुमच्या विशेष आवडीचे आहेत. आयुष्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल आहे. प्रेम प्रकरणात तुम्ही संयमी असतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात.


व्यवसाय:- राजकारण, न्यायाधीश, सचिव, सामाजिक कार्यकर्ता, डॉक्टर, प्राध्यापक.


शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पिवळा, जांभळा हिरवा.,


शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथिस्ट, लसण्या. (रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली परीक्षण करून घेणे)


🔭 रवी लाभ चंद्र.

🔭 चंद्र केंद्र मंगळ.

🔭 चंद्र लाभ बुध.

🔭 चंद्र त्रिकोण शनी.

🔭 चंद्र लाभ हर्षल.

🔭 चंद्र त्रिकोण नेपच्यून.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चतुर्थ स्थानी चंद्र आहे. घरगुती कामे मार्गी लागतील. वास्तू, वाहन किंवा गृहसजावटीसाठी खर्च कराल. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मनातील चिंता कमी होईल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) तृतीय स्थानी चंद्र आहे. धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांकडून सहकार्य लाभेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. लहान प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायात प्रगती होईल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) द्वितीय स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. बोलण्याच्या कौशल्यामुळे कामे मार्गी लागतील. चंद्र लाभ बुध योगामुळे बौद्धिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन खरेदीचा योग आहे. कुटुंबीयांसोबत आनंददायक वेळ जाईल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. मन आनंदी राहील. रवी लाभ चंद्र योगामुळे प्रतिष्ठा आणि मान-सन्मान मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. महत्त्वाचे निर्णय आज यशस्वी ठरतील.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढतील पण त्यातून समाधान मिळेल. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. काही जुन्या आठवणी मनाला स्पर्श करतील. गुप्त शत्रूपासून सावध राहा. आर्थिक आवक मात्र चांगली राहील.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक आवक वाढेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आज तुमच्या कल्पनाशक्तीचा चांगला उपयोग होईल.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दशम स्थानी चंद्र आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. अधिक जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आर्थिक व्यवहार यशस्वी ठरतील.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) नवम स्थानी चंद्र आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. भाग्याची साथ लाभेल. तीर्थयात्रेचे योग संभवतात. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल. काही नवीन अनुभव मिळतील.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अष्टम स्थानी चंद्र आहे. मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. आरोग्याची काळजी घ्या. गंड योगामुळे वादविवाद टाळावेत. मात्र मंगळाच्या अनुकूलतेमुळे धैर्य आणि मानसिक ताकद वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) सप्तम स्थानी चंद्र आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारी व्यवसायात लाभ संभवतो. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. नवीन संबंध प्रस्थापित होतील. सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) षष्ठ स्थानी चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. नोकरीत अधिकार वाढतील. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) पंचम स्थानी चंद्र आहे. मन आनंदी राहील. कला, साहित्य आणि सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. गुंतवणुकीतून लाभ संभवतो.


 ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी - 8087520521)

Comments