आजचे राशीभविष्य
🌞 शुक्रवार, २२ मे २०२६
अधिक ज्येष्ठ षष्ठी / (सकाळी ६.२५ नंतर) सप्तमी.
ग्रीष्म ऋतू. पराभव नाम संवत्सर.
शके १९४८, संवत २०८२.
🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 (संपर्क - 8087520521)
⏰ राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज क्षय तिथी आहे.
🌙 चंद्रनक्षत्र - आश्लेषा.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क. (सकाळी ८.१९ पर्यंत वृद्धी योग)
२२ मे रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल, बुध आणि शुक्र यांचा प्रभाव आहे. तुमची शरीरयष्टी चांगली आहे. डोळे सुंदर आहेत. स्वभावअस्थिर असतो. अनेकदा तुम्ही अनाकलनीय निर्णय घेतात. भिन्न लिंगी व्यक्तीकडून तुम्हाला लाभ मिळतात. स्वतःच्या व्यवसायात यश मिळते. मित्र परिवार मर्यादित असतो. वादविवाद करायला तुम्ही तयार असतात. आयुष्यातील ४० ते ६० ही वर्ष महत्वाची असतात. सुरुवातीला जीवनात संघर्षं असला तरी नंतर उत्तम यश मिळते. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी असते. तुमच्या जीवनात बरेच चढ-उतार येतात. अनेकदा तुमच्या आयुष्यात अनपेक्षित घटना घडत असतात. तुम्हाला कधीकधी काही विलक्षण अनुभव येतात. तुमच्यात जबरदस्त उत्साह आणि जोम आहे. कितीही विरुद्ध परिस्थिती असली किंवा अडचणी असल्या तरी तुम्ही त्यास समर्थपणे तोंड देऊ शकतात. तुम्ही व्यापारी वृत्तीचे आहात आणि तुमच्या कामाचा वेग प्रचंड आहे. शास्त्राची तुम्हाला आवड आहे. हातात घेतलेले काम शक्यतो वेळेच्या आधी पूर्ण करण्याकडे तुमचा कल असतो. "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती" असं तुमचं वर्णन करता येईल. जुन्या रूढी आणि परंपरा तुम्हाला फारसे आवडत नाही. तुम्हाला खोटेपणाची चीड आहे. नवनवीन गोष्टी करणे आणि प्रवास करणे याची तुम्हाला आवड आहे. तुमच्या अवतीभवती मित्र मंडळ यांची गर्दी असते. मात्र तुम्हाला सतत बदल हवा असतो. त्यामुळे तुमचे मित्र मंडळ नेहमी बदलत असते. डोकं शांत ठेवून काम केल्यास तुम्हाला जीवनात उत्तम यश मिळू शकते. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. तुमच्या स्वभावात ठामपणा आहे मात्र तुम्ही अहंकार टाळला पाहिजे.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, इलेक्ट्रॉनिक्स, इंटेरियर डेकोरेशन. बँकिंग, व्यापार, आयात निर्यात, भौतिक शास्त्र, वैद्यकीय शास्त्र, वजन आणि मापे नियंत्रण.
शुभ दिवस:- सोमवार, शुक्रवार, शनिवार.
शुभ रंग:- निळा, पिवळा, नारंगी, राखाडी.
शुभ रत्न:- पाचू, पुष्कराज, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
🔭 रवी युती हर्षल.
🔭 बुध लाभ शनी.
🔭 शुक्र केंद्र नेपच्यून.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) तुमचा स्वभाव धाडसी आणि कार्यतत्पर आहे. आज ग्रहमान अनुकूल आहे. घरगुती वातावरण आनंददायक राहील. रवी हर्षल युतीमुळे अचानक एखादा निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. प्रिय व्यक्तीसोबत वेळ आनंदात जाईल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) तृतीय स्थानी चंद्र आहे. धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. घरात काही नवीन बदल करण्याचा विचार कराल. व्यवसायात आर्थिक लाभ होतील. बुध लाभ शनी योगामुळे नियोजनबद्ध कामातून यश मिळेल. जुनी येणी वसूल होतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) आज सुखकारक दिवस आहे. मन आनंदी राहील. तुमची विनोदबुद्धी इतरांना आकर्षित करेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. काही नवीन कल्पना सुचतील. मात्र खर्च वाढू शकतो. उपासना केल्यास मानसिक शांतता लाभेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. कलागुणांना वाव मिळेल. आर्थिक लाभ झाल्याने मन प्रसन्न राहील. मित्रांकडून सहकार्य आणि भेटवस्तू मिळू शकतात. रवी हर्षल योगामुळे काही अचानक घटना घडू शकतात.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) व्यय स्थानी चंद्र आहे. खर्च वाढणार असले तरी काळजीचे कारण नाही. प्रिय व्यक्तीसाठी खर्च कराल. मानसिक तणाव टाळण्यासाठी शांत राहणे आवश्यक आहे. नोकरीत काही अडचणी येऊ शकतात पण त्यावर मात कराल.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) लाभ स्थानी चंद्र आहे. आर्थिक आवक वाढेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. बुध लाभ शनी योगामुळे तुमची निर्णयक्षमता वाढेल. नवीन योजना यशस्वी ठरतील. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दशम स्थानी चंद्र आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. तुमची एकाग्रता आणि संशोधन वृत्ती यामुळे प्रगती होईल. शुक्र केंद्र नेपच्यून योगामुळे कला आणि सर्जनशील क्षेत्रात विशेष लाभ होतील. वाहन चालवताना काळजी घ्या.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) नवम स्थानी चंद्र आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. बदलत्या ग्रहमानाचा आनंद घ्या. प्रवासाचे योग संभवतात. भिन्न लिंगी व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. मात्र खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अष्टम स्थानी चंद्र आहे. आवडत्या छंदात रममाण व्हाल. गूढ विषय आणि संशोधनात रस वाढेल. वाहनसुख लाभेल. नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) सप्तम स्थानी चंद्र आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारी व्यवसायात लाभ संभवतो. आर्थिक लाभ मिळवण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) षष्ठ स्थानी चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. पत्नी किंवा जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. ज्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही. आरोग्याची काळजी घ्या.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) पंचम स्थानी चंद्र आहे. व्यावसायिक लाभ वाढतील. महिलांकडून सहकार्य मिळेल. कला आणि सर्जनशील क्षेत्रात प्रगती होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. विनाकारण शत्रुत्व टाळा.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments
Post a Comment