राष्ट्र सेविका समिती विजयघोष कार्यक्रमात स्पर्धा आणि हितगुजपर संवाद

 राष्ट्र सेविका समिती विजयघोष कार्यक्रमात स्पर्धा आणि हितगुजपर संवाद



कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क 

राष्ट्र सेविका समिती या संघटनेला यंदा ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या शारीरिक घोष विभागामार्फत सामूहिक घोष वादनाच्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

प्रांतात एकाच दिवशी, एकाच वेळी, चार स्थानांवर कोल्हापूर, अहिल्यानगर आणि पुणेमध्ये दोन ठिकाणी घोष प्रतियोगिता व सांघिक वादन झाले.



कोल्हापूर विभागाचा विजयघोष कार्यक्रम १ मे २०२६ रोजी प्रायव्हेट हायस्कूल मैदान येथे उत्साहात पार पडला. या घोष वादनात कोल्हापूर विभागातून सांगली, सातारा, कराड, सोलापूर, दक्षिण कोल्हापूर व उत्तर कोल्हापूर असे ६ जिल्हे सहभागी झाले होते. 

प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्रीयुत राजप्रसाद धर्माधिकारी (ज्येष्ठ तबलावादक)  होते.त्यांनी राष्ट्र सेविका समितीच्या नव्वद वर्ष पूर्तीच्या कार्यक्रमात  विजय घोष या  मोठ्या जाहीर कार्यक्रमासाठी सेविकांनी घेतलेली मेहनत दिसली आणि घोष सादरीकरण उत्तम प्रकारे संपन्न  झाले असे   नमूद केले.आणि प्रमुख वक्त्या माननीय भाग्यश्री साठ्ये (केंद्रीय कार्यकारिणी सदस्य), उपस्थित होत्या.  त्यांनी समिती मध्ये घोष गणाचे महत्त्व प्रतिपादन केले.घोष गणाचे माध्यमातून संघटन हे अधिक महत्त्वाचे कसे आहे या बद्दल त्यांनी विचार मांडले.तसेच घोष किंवा संगीत या गोष्टी साठी साधना किती महत्त्वाची असते हे ही विशद केले.

कोणत्याही कार्यक्रमात पांढऱ्या शुभ्र गणवेशातील सेविकांचे उत्तम नियोजन, शिस्तपालन, वेळेचे बंधन हे समितीचे वैशिष्ट्यच आहे.. त्याप्रमाणेच अतिशय नियोजनबद्ध रीतीने हा कार्यक्रम पार पडला. उत्तर, दक्षिण व शहर कार्यवाहिका गौरी मुजुमदार, अनघा नाईक, प्रज्ञा परांजपे व समितीच्या सर्व सेविका यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक, परिचय - गायत्री सुमंत (सोलापूर), सूत्रसंचलन - ऐश्वर्या बेहेरे (उ. कोल्हापूर) यांनी केले. अनघा नाईक (द. कोल्हापूर) यांनी आभार मानले. व ऋचा कामत यांच्या वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गौरी मुजुमदार, अनघा नाईक, प्रज्ञा परांजपे, देवयानी पलुसकर, चिन्मयी कोटी आणि अन्य सर्व सेविकांनी  अथक परिश्रम घेतले. चार जिल्ह्यातील घोष पदकासह पंचक्रोशीतील  नागरिक- हितचिंतक  यावेळी उपस्थित होते .

Comments